team jeevandeep 20/12/2024 स्थानिक बातम्या
कल्याण : सासऱ्याने जावयावर ॲसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हनिमुनला जाण्यावरुन सासरा आणि जावई यांच्यात वाद झाल्याने त्या वादातून हा हल्ला केला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सासऱ्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
ईबाद फालके असं जावयाचं नाव असून जकी खोटाल असे हल्लेखोर सासऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जावई आणि मुलीने प्राथनेसाठी मक्का मदिनेला जावे, अशी सासरा जकी खोटालची मागणी होती. मात्र, जावयाने आम्ही काश्मीरला जाणार असल्याचे सासऱ्यांना सांगितले. यावरुन त्यांचा काही दिवसांपासून वाद सुरू होता.
दरम्यान, जावई आणि मुलगी हनिमुनला कुठे जाणार दोघांमध्ये वाद असतानाच सासऱ्याने जावयावर अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.