Team jeevandeep 22/08/2024 स्थानिक बातम्या
कल्याण : गतका फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित 24 ते 27 ऑगस्ट पंजाब येथे स्पर्धेसाठी महाराष्ट्राची टीम पंजाबला रवाना होत आहे आहे. "असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्र आणि अचीवर कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्स" यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र टीमचे किट (ट्रॅकसूट) वाटप आणि शुभेच्छा समारंभाचा आयोजन करण्यात आले होते.
या शुभेच्छा समारंभासाठी असोसिएशन ऑफ गतका महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष चौधरी, जनरल सेक्रेटरी प्रा.आरती चौधरी, टेक्निकल डायरेक्टर प्रा. दलजीत सिंग खोकर आणि अचीवर्स कॉलेज ऑफ़ कॉमर्स एंड मैनेजमेंटचे संचालक महेश भिवंडीकर, पत्रकार उमेश जाधव सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी इत्यादी मान्यवर खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. पंजाब येथे होणाऱ्या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून वयोगट 11 ते 30 मधील मुले आणि मुली असे एकूण तब्बल 131 खेळाडू इतका मोठा संघ पहिल्यांदाच सहभागी होणार आहे.