00/00/0000

➤ उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग ➤ पूर्णवेळ काम तरी तुटपुंज वेतन, टिएमटी कंत्राटी कामगारांच्या व्यथा ➤‘लाडक्या बहिणीं’साठी उद्धव ठाकरे मैदानात ईडीचे मुंबई, पुणे व दिल्लीत २१ ठिकाणी छापे  चित्रपट कलाकांरांनी टी-२० विश्वचषक संबंधी केली सट्टेबाजी संकेतस्थळाची जाहिरात ➤

  team jeevandeep      20/12/2024      स्थानिक बातम्या


रायगड (जिमाका)दि.19:-केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात दि.19 ते दि.24 डिसेंबर 2024 दरम्यान सुशासन सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहांतर्गत ‘प्रशासन गाँव की ओर’ मोहीम राबविण्यात येणार  आहे. यासप्ताहांतर्गत 'प्रशासन गाव की ओर' हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपजिल्हाधिकारी डॉ.रविंद्र शेळके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, प्रशासन अधिकारी श्याम पोशेट्टी, तहसिलदार शीतल रसाळ आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना श्री.जावळे यांनी सांगितले की या ‘सुशासन सप्ताह-प्रशासन गाँव की ओर’ मोहिमेंतर्गत प्रशासनातील विविध विभागांच्या सेवांचा लाभ नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आराखडा तयार करावा. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांतर्गत लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारुन तात्काळ दाखले वाटप करावे. प्रलंबित तक्रारींचा निपटारा करुन घ्यावा. केंद्र शासनाची ही महत्त्वाकांक्षी मोहीम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावी. या मोहिमेदरम्यान विभागांनी अभिनव उपक्रम राबवावेत तसेच या मोहिमेला विशेष प्राधान्य देवून नियोजन करावे, असे निर्देश श्री. जावळे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीस जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

+