team jeevandeep 20/12/2024 स्थानिक बातम्या
उल्हासनगर, बदलापूर:
खरंतर गूगल आणि युट्यूब हे नवशिक्यांना अनेक विधायक कामे, प्रशिक्षणं घेऊन अनेक जण वेगवेगळ्या कला अवगत करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. पण याच युट्यूबवर सोनसाखळी चोरीच्या अनोख्या ट्रिक्स शिकुन
बदलापुरात चेन स्नॅचिंग करणारा एक अट्टल सोनसाखळी चोर बदलापूर पूर्व पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. प्रवीण प्रभाकर पाटील असं या चोरट्यांचं नाव आहे.
झटपट पैसे कमवण्यासाठी या जगात काही जण शॉर्ट कर्ट वापरतात. असा एक प्रकार करणार्या एका चोरांचा बदलापूर पूर्व पोलिसांनी शोध लावलाय. बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसात चेन स्नॅचिंगचे सलग ५ गुन्हे घडले होते. याप्रकरणी बदलापूर पोलिसांचा कसुन तपास सुरू होता. अशातच बदलापूर शहरात संशयास्पद पणे फिरणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केली असता त्याने आपणच चेन हे स्नॅचिंगचे ५ गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिलीय.
प्रविण हा कर्जत जवळच्या शेलू इथं राहणारा आहे. याच्यावर आधी कर्जत तालुक्यात हत्येच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. त्यानंतर त्याने पटापट पैसे कमावण्याच्या उद्देशाने युट्यूबवर चेन स्नॅचिंग कशी करावी? याच्या माहिती देणारे व्हिडिओ सर्च करून ट्रिक्स शिकायला सुरुवात केली.
त्यानंतर बदलापूर शहरात एकटाच येऊन तो चेन स्नॅचिंग करू लागला.
अखेर, बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि गुन्हे पोलीस निरीक्षक राजेश गजल यांच्या मार्गदर्शना खालील टीमने प्रवीण पाटील याला वेळीच बेड्या ठोकल्या. पोलिसांनी या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेलं साडेचार तोळे सोनं देखील हस्तगत केल्याची माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.