Thane Jeevandeep 07/09/2024 स्थानिक बातम्या
कल्याण : मध्यंतरी समाजमाध्यमांवर डोंबिवली पुर्वेतील डोंबिवलीतील मोर्डन प्राईड हॉटेलच्या समोर,कस्तुरीप्लाझा लगत,डोंबिवली पुर्व येथे मार्गीकेस महिनाभरापुर्वी ‘किट्टा अण्णा शेट्टीमार्ग’ असा फलक लावण्यात आले आहे. तसेच त्या फलकावर ‘डोंबिवली खाद्यसंस्कृतीचे जनक’ अन ‘डोंबिवली भूषण’ अशी पदवी ‘स्व.किट्टा अण्णा शेट्टी’ यांच्या नावापुढे लावले आहे ह्यावर पंचमहाभूत सर्वेश तरे यांनी ‘आपल्या जमीनी,आपली गावा,आपले रस्त्यांना आपलीच नावा’ असे म्हणत समाजमाध्यमांवर निषेध व्यक्त केला.
याच अनुषंगाने आज डोंबिवलीतील स्थानिक भूमिपुत्र चळवळीतील युवाकिर्तनकार ह.भ.प विनीत महाराज म्हात्रे, डॉ.शोभा पाटील, गायक केतन पाटील, नितेश पाटील, दयानंद म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली महानगर पालीकेच्या अतिरिक्त आयुक्तांना भेटून जाब विचारला. सोबतच डोंबिवलीचे खाद्यसंस्कृतीचे जनक हे इकडचे भूमीपुत्र असून अशी पदवी कशी दिली जाते हे देखील विचारले अन संबंधीत विभागात ‘माहितीचा अधिकार अर्ज’ देखील दिला आहे. तसेच इकडील भूमीपुत्रच इथला ‘खाद्यसंस्कृतीचा जनक’ आहे तर अशा पदव्या कशा लागतात असा सवालही ह.भ.प विनीत महाराज म्हात्रे यांनी केला आहे.