team jeevandeep 20/12/2024 स्थानिक बातम्या
कल्याण : टिटवाळा मांडा परिसरात पाणीपुरवठा वाहिन्याचे लिकेज काढण्याचे काम सुरू असताना शॉक लागून एका कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.
मांडा टिटवाळा परिसरातील रविंद्र अँर्केड परिसरात जल वाहिन्यांचे लिकेज काढण्याचे काम सुरू होते. पाणी काढण्यासाठी सबमर्शिबल पंप लावला होता. याठिकाणी ठेकेदाराचा कंत्राटी कामगार अरूण कांबळे हा काम करीत असताना पाण्यामध्ये विघुत प्रवाह उतरल्याने अरूण यांस विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. अरूण यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुक्मिणीबाई रूग्णालयात नेण्यात आला असल्याची माहिती अधिकारी सूत्रांकडून मिळाली.
मोहने परिसरात अरूण कांबळे यांच्या शॉक लागून मृत्यू झाल्याची वार्ता मिळताच परिसरात एकच हळ हळ व्यक्त होत होती. अरूणच्या पश्चात दोन लहान मुले, पत्नी यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.