00/00/0000

➤ उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग ➤ पूर्णवेळ काम तरी तुटपुंज वेतन, टिएमटी कंत्राटी कामगारांच्या व्यथा ➤‘लाडक्या बहिणीं’साठी उद्धव ठाकरे मैदानात ईडीचे मुंबई, पुणे व दिल्लीत २१ ठिकाणी छापे  चित्रपट कलाकांरांनी टी-२० विश्वचषक संबंधी केली सट्टेबाजी संकेतस्थळाची जाहिरात ➤

  Thane jeevandeep      06/09/2024      स्थानिक बातम्या


कल्याण : जीवनदीप शैक्षणिक संस्था  संचलित, कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेली येथे  बीएमएस विभाग गोवेली आणि आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज द्वारली, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने "उद्योजकतेद्वारे प्रभावशाली व्यवसाय कसा निर्माण करावा"या विषयावर 'आंतरराष्ट्रीय वेबिनारचे' आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून सहाय्यक संचालक, आर्ट मॅन इन्स्टिट्यूट मियामी, युएसए,महात्मा गांधी शांतता पुरस्कार आणि टेरेसा पुरस्कार प्राप्त असलेल्या प्रसिद्ध तज्ञ जेसीका आशे सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, डॉ. विलास गायकर तसेच विभाग प्रमुख प्रा. उल्हास गायकर यांनी केली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या डॉ.जेसीका आशे यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन केले आणि संवादाच्या आव्हानांवर चर्चा केली.  तसेच सर्जनशील समस्यांचे समाधान, व्यवसाय अभ्यासाची प्रक्रिया आणि उद्योजकतेतील भविष्यातील ट्रेड्स आणि विशेषतः ई-कॉमर्स वर चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी फुल ब्राईट शिष्यवृत्ती आणि अमेरिकेमध्ये अध्ययनासाठी इतर संधीच्या बाबत माहिती दिली. ज्यामुळे सहभागींच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शनाची समज वाढली.

या वेबिनार मध्ये 60 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.के.बी. कोरे यांनी केले. हा कार्यक्रम अत्यंत संवादात्मक आणि माहितीपूर्ण ठरला. ज्यामुळे सहभागींना त्यांच्या उद्योजकीय उपक्रमांसाठी मूल्यवान अंतर्दृष्टी आणि व्यवहारिक सल्ला प्राप्त झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक प्रशांत घोडविंदे, प्रा.हरेंद्र सोष्टे तसेच बीएमएस विभागातील प्रा.सचिन कांबळे, प्रा. अपर्णा जाधव, प्रा. निकिता घोडविंदे यांचे योगदान लाभले. 

+