00/00/0000

➤ उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग ➤ पूर्णवेळ काम तरी तुटपुंज वेतन, टिएमटी कंत्राटी कामगारांच्या व्यथा ➤‘लाडक्या बहिणीं’साठी उद्धव ठाकरे मैदानात ईडीचे मुंबई, पुणे व दिल्लीत २१ ठिकाणी छापे  चित्रपट कलाकांरांनी टी-२० विश्वचषक संबंधी केली सट्टेबाजी संकेतस्थळाची जाहिरात ➤

  Thane jeevandeep      15/10/2024      स्थानिक बातम्या


विद्यार्थ्यांनी तब्बल आठ तास ग्रंथालयात बसून केले कादंबरी,जीवन चरित्रांचे वाचन

 गोवेली : कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेली येथे दिनांक 15 ऑक्टोबर रोजी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागात डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. एपीजे अब्दुल कलम यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले . यावेळी ग्रंथालयाचे विभाग प्रमुख प्रा. राजाराम कापडी यांनी त्यांच्या मनोगतातून  वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य  हरेंद्र सोष्टे यांनी देखील विद्यार्थ्यांना वाचन करणे किती गरजेचं असतं वाचनामुळे आपल्या जीवनामध्ये किती बदल घडत जातो. वाचनामुळे आपले विचार कशा पद्धतीने बदलले जातात याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे औचित  साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल आठ तास विद्यार्थ्यांनी वाचन कक्षात बसून महनीय व्यक्तींचे जीवन चरित्र. ग्रंथ. यांचे वाचन केले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे प्राचार्य डॉ.के.बी कोरे प्रा हरेंद्र सोष्टे. ग्रंथपाल विभाग प्रमुख प्रा  राजाराम कापडी व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोहणे.  प्रा. नरेश टेंबे  डॉ.निहारिका देशमुख, प्रा. जया देशमुख. मास मीडिया विभाग प्रमुख डॉ. राहुल तौर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.महेश थोरात डॉ. आनंद बोरडे , प्रा. सतीश लकडे, प्रा. हनुमंत मेंगाळ. प्रा. मोहन गारे  व इतर वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील इतर प्राध्यापक वर्ग तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य,विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा या आनंदमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला..

+