00/00/0000

➤ उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग ➤ पूर्णवेळ काम तरी तुटपुंज वेतन, टिएमटी कंत्राटी कामगारांच्या व्यथा ➤‘लाडक्या बहिणीं’साठी उद्धव ठाकरे मैदानात ईडीचे मुंबई, पुणे व दिल्लीत २१ ठिकाणी छापे  चित्रपट कलाकांरांनी टी-२० विश्वचषक संबंधी केली सट्टेबाजी संकेतस्थळाची जाहिरात ➤

  team jeevandeep      20/12/2024      स्थानिक बातम्या


बदलापूरच्या वालीवली गावातील घटनेने  ...

उल्हासनगर, प्रतिनिधी :

बैलगाडा शर्यतीची आवड असणाऱ्या एका मालकाने आवडीने तीन वर्षां पूर्वी नविन बैल घ्यावा. त्याला जीव लावावा. त्याच्या खाद्यासाठी लाखो रुपये खर्च करावेत. आणि त्याच बैलाने त्याच मालकाचा जीव घ्यावा अशी ह्रदय पिळवटून टाकणारी घटना बदलापूर मध्ये घडलीय. या घटनेने बदलापुरात गावात हळहळ व्यक्त होत आहे.

         बदलापूरमधील वालीवली गावात ही आश्चर्यकारक  घटना घडली आहे.  याच गावात राहणारे विजय म्हात्रे (३५) हे कराटे व स्केटिंग चैंपियन होते. आपल्या बैलगाड्याची हौस फिटवण्यासाठी त्याने नवीन बैल विकत घेतला. त्या बैलाची योग्य निगा ही ठेवली होती . त्याला खाण्यासाठी महागडा चारा आणि खाद्य देखील पुरवत होता. पण अचानक विजय काल या बैलाला चारण्यासाठी शेतात गेला. सलग चार तास उलटल्या नंतरही विजय न परतल्याने घरच्यांनी त्यांचा शोध सुरू केला.  मात्र ,चार तासानंतर तो शेतात जखमी आणि मृताअवस्थेत आढळला. तर याच बैलाने विजय ला सतत ४ तास धडका मारुन बैलाने प्रथम ठार केले विजयच्या नातेवाईकांच्या लक्षात आले. 

 मृत विजय म्हात्रे हे कराटे आणि स्केटिंगमध्ये प्रवीण होते. ते बदलापूर येथील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. विजय म्हात्रे  बैलांच्या शर्यती साठी तो खूप लांब लांब जायचा. त्यासाठी त्यांनी हा बैल खरेदी केला होता. विजय म्हात्रे यांनी मोठ्या उत्साहाने त्यांची काळजी घेतली. बैल चालवण्याचा आणि गाडी चालवण्याचा रोजचा सराव होता.

मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास विजय म्हात्रे हे त्यांचा बैल त्यांच्या घराजवळील गोठ्यात घेऊन गेले. ते रात्री ८: ३० वाजेपर्यंत विजय म्हात्रे घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांचा शोध  घेतला. तेव्हा विजय म्हात्रे हे घरापासून काही अंतरावर शेतात मृतावस्थेत आढळले.   त्यावरून बैलाच्या अंगावर झालेल्या जखमा आणि पोटात मोठी जखम झाल्याने बैलाचाही मृत्यू झाल्याचे समजले.

+