00/00/0000

➤ उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग ➤ पूर्णवेळ काम तरी तुटपुंज वेतन, टिएमटी कंत्राटी कामगारांच्या व्यथा ➤‘लाडक्या बहिणीं’साठी उद्धव ठाकरे मैदानात ईडीचे मुंबई, पुणे व दिल्लीत २१ ठिकाणी छापे  चित्रपट कलाकांरांनी टी-२० विश्वचषक संबंधी केली सट्टेबाजी संकेतस्थळाची जाहिरात ➤

  Thane jeevandeep       15/10/2024      स्थानिक बातम्या


UBT (1) (1) 

कल्याण :   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू होण्यापूर्वी शेड बांधून उद्घाटन होण्यापूर्वीच पालिकेने  शेडवर कारवाई केल्याने सोमवारी उबाठा गटाचे पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी यांनी "अ" प्रभागक्षेत्र कार्यालयावर धडक देत "अ" प्रभाग सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना जनसंपर्क कार्यालयाचे निवारा शेड तोडल्या बाबत धारेवर धरले. अखेर "अ" प्रभाग सहाय्यक आयुक्त यांनी तक्रारी वरून कारवाई केली.तसेच दिलगिरी व्यक्त केल्याने उबाठा गटाचे शिवसैनिक शांत झाले.    

याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांना शिवसेना उपशहर प्रमुख सुरेश सोनार यांनी प्रतिक्रिया दिली की, राजकीय आकासापोटी जनसंपर्क कार्यालयाच्या  शेडवर  कारवाई केली गेली. सहाय्यक आयुक्तांना अ प्रभागातील अनाधिकृत इमारतीची बांधकामे दिसत नाहीत का? जनसंपर्क कार्यालयात आपल्या समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या नागरिक, जेष्ठांच्या सोयीसाठी निवारा शेड उभारली होती. अ  प्रभाग सहाय्यक आयुक्त यांनी कारवाई संदर्भात दिलगिरी व्यक्त केली असल्याचे सांगितले.

या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी,   उपजिल्हा प्रमुख माजी नगरसेवक विजय काटकर, माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी, उपशहर प्रमुख सुरेश सोनार, सुरेश पाटील, ऋषिकांत पाटील, लक्ष्मण तरे, शतृघ्न तरे, नयन पाटील, विजय कोट, विजय पाटील, संजय शेळके आदी पदाधिकारी कार्यकर्ते  उपस्थित होते.

+