00/00/0000

➤ उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग ➤ पूर्णवेळ काम तरी तुटपुंज वेतन, टिएमटी कंत्राटी कामगारांच्या व्यथा ➤‘लाडक्या बहिणीं’साठी उद्धव ठाकरे मैदानात ईडीचे मुंबई, पुणे व दिल्लीत २१ ठिकाणी छापे  चित्रपट कलाकांरांनी टी-२० विश्वचषक संबंधी केली सट्टेबाजी संकेतस्थळाची जाहिरात ➤

  team jeevandeep      20/12/2024      स्थानिक बातम्या


रायगड,दि.19(जिमाका):- नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने तसेच नाताळ सणाच्या सुट्टीमुळे कोकणामध्ये विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिध्द गड किल्ले, धबधबे, तलाव, नदी समुद्राकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. यापूर्वी समुद्रामध्ये बुडून, धबधबे, तलावाच्या ठिकाणी पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांची संभाव्य जीवित हानी होऊ नये, यासाठी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी संबंधित विभागांनी आपल्या स्तरावरुन पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड-अलिबाग संदेश शिर्के यांनी दिल्या आहेत.

नगरपालिका/ग्रामपंचायतीमार्फत सर्व बीचेसवर, गड किल्ले, धबधब या ठिकाणी बोर्ड/फ्लेक्स बोर्ड/बॅनरव्दारे सुचनाफलक लावावेत.  गड/किल्ले, धबधबे, समुद्र किनाऱ्यावर बिचवर पोलीस विभागाने पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. मुख्य अधिकारी यांनी नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये तसेच तहसिलदार/गटविकास अधिकारी यांनी ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून पर्यटनस्थळी सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णवाहिका, बचाव साहित्य, रबरी बोट, लाईफ जॅकेट, जीवरक्षक, सुरक्षा गार्ड, गाईड इ. सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. वन व्यवस्थापन समितीमार्फत गड किल्ल्यावर जाणाऱ्या मार्गावर सुचनां फलक लावावेत. स्थानिक प्रशिक्षित गाईड उपलब्ध करावेत. उपविभागीय अधिकारी तहसिल कार्यालयाकडील लाईफ जॅकेटस् व लाईफ बोयाज, टॉर्च, रोप इ. साहित्य आपत्कालीन प्रसंगी स्वयंसेवकांना उपलब्ध करुन देण्यात याव्यात. नागरी संरक्षण दल व गृहरक्षक दलाकडील स्वयंसेवकांना जीवरक्षक म्हणून ठेवण्यात यावे. नगरपालिका/ग्रामपंचायती यांनी सुरक्षा जॅकेट, बोटी, पोहणाऱ्या व्यक्ती इ. संसाधने उपलब्ध ठेवावीत.  इंडियन कोस्ट गार्ड विभागाने आवश्यक बोटी, लाईफ जॅकेट, डायव्हर्स इ. उपलब्ध करुन देण्यात यावेत, घटना घडल्यास समुद्र किनारी तात्काळ शोध व बचाव मोहिम हाती घ्यावी. नगरपालिका/ग्रामपंचायती यांनी पर्यटनस्थळी घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक कार्यवाहीकरावी. स्वच्छत्ता पथक स्थापित करावेत.  पर्यटनस्थळी पार्किंगची पुरेशी व्यवस्था करावी.

नगरपालिका/ग्रामपंचायतीने ध्वनीक्षेपकाव्दारे बीचवर पर्यटकांना स्वतःची काळजी घेणे, खोल समुद्रात न जाणे इ. सुचनां पर्यटकांना देण्यात याव्यात.  बीचवरील अनधिकृत वॉटरस्पोर्टस, ए.टी.व्ही. वाहने, पॅरासेलिंग, विविध वॉटर राईडस् चालविणाऱ्या विरुध्द कारवाई करावी,  नद्यांवर रिव्हर राफ्टींग, वॉटरस्पोर्टस उपक्रम चालविणाऱ्या संस्थांकडे पुरेसे तज्ञ मनुष्यबळ व सुरक्षेचे साहित्य उपलब्ध आहे अगर कसे याची तपासणी करावी. अनधिकृत उपक्रम चालविणाऱ्या संस्था/व्यक्ती यांच्यावर नियमोचित कारवाई करावी. पर्यटनस्थळावर मनोरंजनासाठी चालविण्यात येणाऱ्या विविध खेळ, उपक्रमांसाठी संबंधित संस्था/व्यक्ती यांनी शासनाकडून परवाना घेतला आहे अगर कसे? तसेच त्यांच्याकडे कुशल मनुष्यबळ व सुरक्षा साहित्य उपलब्ध आहे अगर कसे? याची सर्व संबंधित विभागप्रमुखांनी त्यांच्यास्तरावरुन तपासणी करावी.  सर्व विभागांचे नियंत्रण कक्ष 24x7 कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी.  कोणत्याही अपघाताप्रसंगी आपल्या विभागाकडून तात्काळ सक्षम प्रतिसाद मिळेल, अशी व्यवस्था करावी. कोणत्याही अपघाताची माहिती तत्काळ जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व नियंत्रण कक्षास सादर करावी.

आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजनां स्थानिक स्वराज्य संस्थांनी कराव्यात, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पर्यटनस्थळांवरील पर्यटकांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेवून शोध व बचाव पथके साहित्यांसह तत्पर ठेवावेत, सुरक्षेच्या उपाययोजनां अभावी घटना घडल्यास संबंधित अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

+