00/00/0000

➤ उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग ➤ पूर्णवेळ काम तरी तुटपुंज वेतन, टिएमटी कंत्राटी कामगारांच्या व्यथा ➤‘लाडक्या बहिणीं’साठी उद्धव ठाकरे मैदानात ईडीचे मुंबई, पुणे व दिल्लीत २१ ठिकाणी छापे  चित्रपट कलाकांरांनी टी-२० विश्वचषक संबंधी केली सट्टेबाजी संकेतस्थळाची जाहिरात ➤

  team jeevandeep      20/12/2024      स्थानिक बातम्या


कल्याण : कल्याणमध्ये उच्चभ्रू गृहसंकुलात मोठा राडा झाला असून मंत्रालयात काम करणाऱ्या परप्रांतीयाने मराठी माणसाला जबर मारहाण केली आहे. हा व्यक्ती गाडीत अंबर दिवा लावून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सोसायटीमधील नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या व्यक्ती विरोधात खडकपाडा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीला 24 तासांत अटक न केल्यास मनसे स्टाईलने धडा शिकवण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

कल्याण पश्चिमेतील योगी धाम परिसरातील अजमेरा हाईटस या गृहसंकुलात राहणाऱ्या अखिलेश शुक्ला याने धूप लावण्याच्या वादातून दहा ते पंधरा जणाच्या टोळीला बोलवून सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केली. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 24 तासात अखिलेश शुक्लाला अटक झाली नाही तर रस्त्यावर उतरु,  शुक्ला जिथे कुठे असेल त्याला मनसे स्टाईलने पोलिस स्टेशनला हजर करु असा इशारा मनसेने दिला आहे. तर खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे.

अखिलेश शुक्ला याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कळवीकटे राहतात. बुधवारी रात्री शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता. धूपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होता होता. याबाबत शेजारी विजय कळवीकटे याने शुक्ला याला टोकले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. या वादातून शुक्ला याने बाहेरून दहा ते पंधरा जणाना बोलावून घेतले. सोसायटीतील लोकांना माराहाण केली. या मारहाणीत विजय कळवीकटे, अभिजीत देशमुख, धीरज देशमुख हे जखमी झाले आहेत. यातील अभिजीत देशमुख गंभीर जखमी असून त्यांच्यावर मुंबईच्या सायन रुग्णालायत उपचार सुरू आहेत.

 अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात काम करटो. त्याच्या गाडीवर अंबर दिवा लावून फिरतो. त्याच्या विरोधात कोणी बोलले तर तो त्याला दमबाजी करतो. काही दिवसापूर्वी एका किरकोळ कारणावरुन त्याने एका तरुणीला तिच्यावर रेप करण्याची धमकी दिली होती. या राड्यानंतर खडकपाडा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले की, धूप लावण्याच्या वादातून हाणामारी झाली आहे. पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अखिलेश शुक्ला याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे.

दरम्यान अखिलेश शुक्ला हा सातत्याने मराठी माणसांना दमबाजी करतो. तुम्ही मराठी आहात. तुम्हाला माझी ताकद माहिती नाही. अशा प्रकारे लोकांना भिती दाखवितो. या बाबत मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी खडकपाडा पोलिसांची भेट घेतली आहे. अखिलेश शुक्ला याची मुजोरी मोडीत काढली पाहिजे. त्याची गुंडगिरी सातत्याने सुरु असते. 24 तासांत त्याला अटक केली नाही तर मनसे स्टाईलने शुक्ला याला धडा शिकवून त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ असा इशारा दिला आहे. 

 

 

+