00/00/0000

➤ उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग ➤ पूर्णवेळ काम तरी तुटपुंज वेतन, टिएमटी कंत्राटी कामगारांच्या व्यथा ➤‘लाडक्या बहिणीं’साठी उद्धव ठाकरे मैदानात ईडीचे मुंबई, पुणे व दिल्लीत २१ ठिकाणी छापे  चित्रपट कलाकांरांनी टी-२० विश्वचषक संबंधी केली सट्टेबाजी संकेतस्थळाची जाहिरात ➤

  Team jeevandeep      22/08/2024      स्थानिक बातम्या


34 वर्षीय आरोपी गजाआड

कल्याण :  अल्पवयीन मुलीला दुकानात घेऊन जाण्याच्या इराद्याने   आपल्या मोकळ्या घरात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कल्याण शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने महात्मा फुले चौक  पोलीस स्टेशन मध्ये या नराधमा विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला गजाआड केले आहे. मात्र या घटनेने कल्याण शहरात खळबळ उडाली आहे.

15 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास साधारण नऊ वर्षापेक्षा कमी वयाने असलेल्या अल्पवयीन मुलीच्या घराचे शेजारी राहत असणाऱ्या राहुल पटेल वय 34 याने अल्पवयीन मुलीस दुकानात घेऊन जात असल्याचा बहाण्याने आपल्या घरी नेले. या ठिकाणी घराचे कडी लावत या नराधमाने आपल्या मुली समवेत अश्लील चाळे करीत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले गेले आहे.

अल्पवयीन मुलीस पलंगावर ढकलत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न यावेळी केला गेला आहे. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तुला जीवेठार मारले जाईल अशी धमकी देखील या नराधमाने आपल्या मुलीस दिल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी देखील अशा स्वरूपाचा प्रकार त्याने केला असल्याचे मुलीचे आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले असून गेम खेळण्याच्या बहाण्याने त्याने आपल्या मुलीच्या छातीला स्पर्श केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. एम एफ सी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत लैंगिकतेने पिसाटलेल्या राहुल पटेल या नराधमास पोलिसांनी गजाआड केले आहे. या संदर्भात एमएससी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

+