00/00/0000

➤ उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग ➤ पूर्णवेळ काम तरी तुटपुंज वेतन, टिएमटी कंत्राटी कामगारांच्या व्यथा ➤‘लाडक्या बहिणीं’साठी उद्धव ठाकरे मैदानात ईडीचे मुंबई, पुणे व दिल्लीत २१ ठिकाणी छापे  चित्रपट कलाकांरांनी टी-२० विश्वचषक संबंधी केली सट्टेबाजी संकेतस्थळाची जाहिरात ➤

  team jeevandeep      20/12/2024      स्थानिक बातम्या


aambedkar 1 

उल्हासनगर, प्रतिनिधी:::

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी संसदेत भाषण करताना बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात एकेरी व गौणत्वदर्शक उल्लेख 

केल्या विरोधात देशभरात आंबेडकरी अनुयायांं मध्ये संतापाची लाट उसळली आहे.या

 वक्तव्याचा उल्हासनगर शहरातुनही तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला. उल्हासनगर कॅम्प ४ च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भिम अनुयायांनी मोठ्या प्रमाणात जमुन अमित शहा विरोधात संतापजनक घोषणा दिल्या. 

       यातील काहींनी हातात आंबेडकरांची प्रतिमा तर काहींनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करणार्या आशयाचे फलक हातात धरले होते. यावेळी अमित शहा यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आणि महिला वर्ग सहभागी झाला होते.

+