00/00/0000

➤ उद्धव ठाकरे फडणवीसांच्या भेटीला, घडामोडींना वेग ➤ पूर्णवेळ काम तरी तुटपुंज वेतन, टिएमटी कंत्राटी कामगारांच्या व्यथा ➤‘लाडक्या बहिणीं’साठी उद्धव ठाकरे मैदानात ईडीचे मुंबई, पुणे व दिल्लीत २१ ठिकाणी छापे  चित्रपट कलाकांरांनी टी-२० विश्वचषक संबंधी केली सट्टेबाजी संकेतस्थळाची जाहिरात ➤

        21/08/2024      महत्वाच्या बातम्या


कल्याण : बदलापूरातील शाळेतील दोन चिमुरड्यांवर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला बुधवारी कल्याण कोर्टात हजर करण्यात आले न्यायालयाने त्याला  २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी पीडितेची बाजू मांडली. विशेष महिला न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांच्या कोर्टात अक्षय शिंदे याला हजर करण्यात आले. तर बदलापूर आंदोलन प्रकरणात 22 आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत  कल्याण लोहमार्ग न्यायालयात हजर केले.

आज मोठ्या पोलिस बंदोबस्तात आरोपी अक्षय शिंदेला कल्याण न्यायालयात हजर केलं.  आरोपीला फाशी द्या अशी मागणी बदलापूरकरांकडून केली जात होती. बदलापुरातील पालक आणि नागरिकांचा रोष पाहता आरोपीवर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे कायदा सुव्यवस्था पाहता पोलिसांनी स्टेशन परिसरासह कल्याण न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र कुणीही घेऊ नये, असे आवाहन कल्याण वकील संघटनेतर्फे करण्यात आले. कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या वतीने बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला. आम्ही वकील पत्र देणार नाही सरकारने त्यांचे वकीलपत्र द्यावा आम्ही आरोपीच्या विरुद्ध लढणार अशी भूमिका कल्याण न्यायालयामधील वकील असोसिएशनने घेतली असल्याची माहिती कल्याण बार असोसिएशन अध्यक्ष प्रकाश जगताप यांनी दिली.

बदलापूर रेल रोको आणि आंदोलन प्रकरणात जमाव जमवणे, रेल रोको करणे, स्टेशन परिसरात तोडफोड, तसेच पोलिसांवर दगडफेक यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या 22   आंदोलनकर्त्यांना आज कल्याण लोहमार्ग पोलिसांनी कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले.  त्यांना न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परंतु या आंदोलन कर्त्यांना  सोडवण्यासाठी कल्याण व बदलापूर वकील संघटनेच्या वतीने कोणताही मोबदला न घेता त्यांना सोडविण्यासाठी न्यायालयात त्यांची बाजू मांडली.

काल रात्री उशिरा कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात 300 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.  या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटनांमुळे रेल्वे प्रवास आणि परिसरात तणाव निर्माण झाला होता.  पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरू ठेवला असून, आंदोलनातील इतर सहभागींचा शोध घेतला जात आहे.      

दरम्यान कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात रेल्वे पोलीस आणि आंदोलनकर्त्याच्या वकिलांमध्ये वाद झाला. पोलिसांनी दिरंगाई केली नसती तर आंदोलन झालं नसतं. आंदोलन कर्त्यांच्या सह्या घेण्यासाठी वकील गेले असता रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी वकिलांशी अरेरावी केल्याचा आरोप वकिलांनी केला असून पोलिसांवर कायदेशीर कारवाई करा, आंदोलन कर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी या वकिलांनी केली. 

+