Team Jeevandeep 19/08/2024 महत्वाच्या बातम्या
चमकोगिरी करणारे कुचकामी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असा 'घरचा आहेर' महायुतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिला होता. मुंबई गोवा हायवेचं बांधकाम रखडल्याबद्दल संताप व्यक्त करताना कदमांनी चव्हाणांवर निशाणा साधला होता. यावर प्रतिक्रिया देताना चव्हाणांनी त्यांना अडाणी संबोधलं आहे. तोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच चव्हाणांनी दिला.
रवींद्र चव्हाण काय म्हणाले?
राष्ट्रीय महामार्ग हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अंतर्गत येतात. त्यामुळे रामदास कदम अडाणी माणूस आहेत, हे माझं मत आहे. रामदास कदम यांच्या बाजूला बसणारे व टाळ्या वाजवणारे त्याच पद्धतीचे असतील.
मला त्यांच्यावर टीका करायला आवडत नाही मात्र त्यांच्या मुलाच्या मतदारसंघात मी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुती सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये दिल्याचा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला.