कल्याण(प्रतिनिधी) 08/08/2024 महत्वाच्या बातम्या
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधुत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ड प्रभागाचे सहा.आयुक्त धनंजय थोरात यांनी कल्याण (पूर्व) चिंचपाडा रोडवरील, मलंगरोड ते उल्हासनगर पर्यंत जाणा-या 100 फुटी रस्त्याला बाधित असलेल्या “माधव अपार्टमेंट” या तळ + 3 मजली अतिधोकादायक स्थितीतील इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई काल पूर्ण केली.