Visitors: 389935
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

साठीतले तरुण : भाई माधवराव बागल

  Team jeevandeep       17/05/2025      vicharmanch    Share


 madhvrav  

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि भाई माधवराव बागल यांचे सख्य मतभेदपूर्ण असते तरी यातील पुरोगामित्वाच्या धाग्याने हा ऋणानुबंध त्यांच्याच शब्दात सांगायचा तर नातलग पातळीपर्यंत घनिष्ठतेच्या कसोटीवर पोहोचलेला होता. उभयता एकमेकांकडे राहत, एकत्र भाषणे देत. एकमेकांबद्दल त्यांनी गौरवलेख, प्रस्तावना, अनावृत्त पत्रे लिहिली आहेत. भाई माधवराव बागल (१८९५-१९८६) पांची षष्ठाब्दीपूर्ती साजरी होत असतानाच्या काळात तर्कतीर्थानी सुभचिंतन करीत साप्ताहिक मौजच्या २७ मे, १९५६ च्या अंकात साठीच्या उंबरठ्यावरील तरुण माधवराव बागत' शीर्षक लेख लिहिला होता. यात भाई माधवराव बागल ज्यांनी पाहिले, ऐकते, अनुभवले आहेत, त्यांना तर्कतीर्थाचं लेखनकोशत्य प्रत्पपास आत्याशिवाय राहणार नाही माधवराव बागल यचि मन अजून तरुण व शरीर ताठ होते. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात त्यांना विशिष्ट स्थान होते. पाणीदार टपोरे ठोले, खादीचा परंतु नीटनेटका पोषाख, फरची उंच टोपी, वगैरे ढब पाहून माणूस त्यांच्यावर खूश होतो. बागलांचा कोल्हापूरच्या राजकारणाशी व सामाजिक चळवळीशी दोन पिढ्यांचा संबंध होता त्यांचे वडील खंडेराव बागल हे छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारातील एक प्रस्थ होते. भाई माधवराव बागल यांच्या जीवनकार्याकडे पाहता प्रजा परिषद, संयुक्त महाराष्ट्र समिती, सत्यशोधक चळवळ, ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ अशी चार पर्व दिसून येताच तर्कतीचा भाईशी प्रथम संबंध आप तो कायदेभंगाच्या चळवळीतून तो १९६६ पर्यंत होता, पण शेवटपर्यंत टिकून राहिला. सत्यशोधक चळवळ त ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीच्या युक्तिवादाची परिणती म्हणजे उभयतांतील मैत्री तिचे वाह तर्कतीर्थाच्या शब्दांत सांगायचे तर, "ब्राह्मणी वर्चस्वाला महाय गांधीच्या चळवळीने पूर्णपणे सुरुंग लावला आहे. बहुजन समाज तिच्यात भाग घेऊ लागला आहे. त्यामुळे बहुजन समाजातही नवे नेते निर्माण होऊ लागतील व ब्राह्मणी वर्चस्व संपुष्टात येईल. बहुजन समाजातील अज्ञान हे ब्राहाणांपेक्षा भयंकर आहे. ते नष्ट झाले तर ब्राह्मणी वर्चस्व नष्ट होईल. कारण ब्राह्मण केवळ शिक्षणानेव पुढारलेला आहे." तर्कतीर्थांचे हे तत्कालीन निरीक्षण आणि निष्कर्ष .

  राजकारणाशिवाय माधवरावांच्या जीवनाचे इतरही पैलू चमकदार होते. माधवराव मोठे लेखक होते. स्वतःस बहुजन समाजातला म्हणवून घेणान्यांमध्ये माधवरावांइतके विपुल लेखन करणारा कोणीही नाही. महाराष्ट्रातील लहान-मोठी वृत्तपत्रे व मासिके गेली ३० वर्षे माधवरावांच्या निर्मळ व सुबोध लेखानाने वारंवार सजलेली आढळतात. माधवराव निसर्गाचे देखावे रंगविण्यात अत्यंत कुशल होते. त्यांच्या नयनमनोहर कृती (चित्रे) कोल्हापुरातील एका सार्वजनिक दिवाणखान्यात मांडलेल्या पाहावयास मिळतात. (सध्या त्यांचे स्थलांतर शिवाजी विद्यापीठात झाले आहे.) आपल्या या चित्रकलेच्या साधनेतून मिळणाऱ्या आनंदाबद्दत भाईंनी आपल्या कला आणि कठावंत ग्रंथात लिहून ठेवले आहे की, "दरिद्री कलावंताचे जीवनसुद्धा ऐश्वर्यसंपन्न असते. त्यांना प्राणधारणेपुरता आधार झाला की, ते समाधानी राहतात. कोट्यधीशांना जन्मोजन्मी न आढळणारा आनंद ते भोगू शकतात. उच्च प्रतीच्या वातावरणात, उच्चतर विचारांच्या मनोभूमिकेत ते तरंगत असतात. यातून देशाची संस्कृती बनत असते. देशाचा दर्जा ठरत असतो."

   माधवरावांच्या जीवनातील व्यक्तिगत शल्यही तर्कतीर्थांनी या लेखात टिपले आहे. ते वाचत असताना हा शापित राजहंस' होता, हे लक्षात येते. छत्रपती शाहू महाराज होते, तोवर त्यांना कौटुंबिक स्वास्थ्य थोडेबहुत भोगावयास मिळाले उत्तरकाळ आर्थिक विवंचनेत गेला. पत्नीच्या आजाराच्या विवंचनेत मोठा काळ गेला. मात्र, एकपत्नी व्रत त्यांनी कसोशीने पाळले. भाई माधवराव बागल यांच्या जीवनप्रवाह आत्मचरित्रास तर्कतीर्थांची हृद्या प्रस्तावना आहे. कोल्हापुर राज्यातून (संस्थान) एक छोटेखानी लोकसत्ताक राज्य निर्माण करू पाहणारा कारागीर म्हणजे माधवराव बागल. बागलांनी आपल्या लेखनाने सत्यशोधक चळवळीला नव्या ध्येयवादाचा  पुरवठा केलेला आहे.. ते ध्येयवादी व पुरोगामी अद्यायावत विचारांचे आहेत, याची खूण येथील कपाटांत भरलेल्या पुस्तकांवरून पटते. (हा संग्रहही शिवाजी विद्यापीठ पुराभिलेख ग्रंथालयात वाचनार्थ उपलब्ध आहे। बागल  हे स्वभावाने समन्वयवादी आणि भावनामय आहेत. ते मूर्तिपूजक आहेत. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले यांचे त्यांनी कोल्हापुरात उभारलेले पुतळे याची साक्ष देतात," असे त्यात त्यांनी म्हटले आहे.

drsklawate@gmail.com

+