Visitors: 226391
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्या-या मोहसिन मुजावर विरूद्ध पेण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल प्रयत्न

  team jeevandeep      10/05/2025      sthanik-batmya    Share


पेण (प्रतिनिधी) : 

भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून भारतात राहणारेच काही गद्दार देशाविरुद्ध चिथावणी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दृश्य दिसत आहेत. असाच काहीसा प्रकार पेण मध्ये घडला आहे. पेण मधील  मुस्लिम समाजाचा मुलगा मोसिन मुजावर याने इन्स्टाग्राम ॲप वरील आयडी वरून इंडिया के रुल्स की तहेस नहेश हो गई है, संभलके रहो हमारे पास तो तलवारे, बॉम्ब, मिसाईल सब रेडी है, देख रहा है ना इराण सब लेके बैठा है जो भी मुस्लिम को तकलीफ देगा एक मिनिट मे उडा देगा वो,एक दिन इंडिया भी हमारा होगा, पूरा कब्जा हमारा होगा, और हम मस्त दबा के मारेंगे असे देशाविरुद्ध विधान करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने पेण मधील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी याचा निषेध केला. पेण नगरपालिका व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर पाकिस्तानचे बॅनर पायाखाली तुडवून नीम का पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम अशा घोषणा देत निषेध रॅली काढली.

   पेण पोलिसांनी याची दखल घेत मोसिन मुजावर याच्यावर भा. न्या. स. कलम 353,1 ख व 353 ( 2 ) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.

+