Visitors: 239233
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

हनिमुनला जाण्यावरुन सासऱ्याचा जावयावर ॲसिड हल्ला

  team jeevandeep      20/12/2024      sthanik-batmya    Share


कल्याण : सासऱ्याने जावयावर ॲसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हनिमुनला जाण्यावरुन सासरा आणि जावई यांच्यात वाद झाल्याने त्या वादातून हा हल्ला केला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सासऱ्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

ईबाद फालके असं जावयाचं नाव असून जकी खोटाल असे हल्लेखोर सासऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जावई आणि मुलीने प्राथनेसाठी मक्का मदिनेला जावे, अशी सासरा जकी खोटालची मागणी होती. मात्र, जावयाने आम्ही काश्मीरला जाणार असल्याचे सासऱ्यांना सांगितले. यावरुन त्यांचा काही दिवसांपासून वाद सुरू होता.

दरम्यान, जावई आणि मुलगी हनिमुनला कुठे जाणार दोघांमध्ये वाद असतानाच सासऱ्याने जावयावर अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

+