Visitors: 389781
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

सौ. कमलताई किसन कथोरे म्हसा महाविद्यालयात शिवजयंती उत्सव सोहळा उत्साहात संपन्न

  Team jeevandeep      19/02/2026      sthanik-batmya    Share


 

म्हसा : श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती महाराष्ट्रात आणि जगभरात वसलेल्या मराठी लोकांकडून १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. हा दिवस महाराजांचे शौर्य, दूरदर्शी नेतृत्व आणि प्रशासकीय कौशल्याचे स्मरण करून साजरा केला जातो. शिवजयंती उत्सव हा केवळ एक सण नसून तो एका महान युगाचा आणि विचारांचा उत्सव आहे, जो तरुण पिढीला प्रेरणा देतो, याच अनुषंगाने बुधवार दि. १८ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०१.०० दरम्यान सौ. कमलताई किसन कथोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, म्हसा येथे इतिहास व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव सोहळा, २०२६ या दिमाखदार अश्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते ज्यामध्ये वक्तृत्व, गायन, नृत्य व शिवराज्याभिषेक सोहळा नाटिका या कार्यक्रमांचा समावेश होता. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सुरुवातीला म्हसा महाविद्यालय -  म्हसा गाव - म्हसा महाविद्यालय या दरम्यान रॅली काढण्यात आली. रॅली मध्ये सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. योगेश माळी सर यांच्या शुभहस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अपर्ण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभाग कर्यक्रम अधिकारी प्रा. कन्या हरड मॅम तसेच इतिहास विभाग प्रमुख प्रा. काजल डोहळे मॅम यांनी कार्यकमाचे प्रास्ताविक सादर केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. योगेश माळी सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिवजयंती उत्सवाची माहिती दिली तसेच सखोल असं मार्गदर्शन केलं. यानंतर सरांच्या शुभहस्ते कला व क्रीडा विभागात विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रा. काजल डोहळे मॅम, प्रा. पुनम भुसाळ मॅम, प्रा. मयूरी घागस मॅम, प्रा. संदीप भावार्थे सर आणि प्रा. दिनेश शेळके सर यांनी विशेष मेहनत घेऊन वक्तृत्व, गायन, नृत्य व शिवराज्याभिषेक नाटिका या कार्यक्रमाची विद्यार्थ्यांकडून उत्तम अशी तयारी करून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय सोनार सर, प्रा. मयुरी घागस मॅम यांनी केलं तर आभारप्रदर्शन प्रा. कन्या हरड मॅम यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविंद्र घोडविंदे सर, संचालिका मा. सौ. स्मिता घोडविंदे मॅम, संचालक मा. श्री. प्रशांत घोडविंदे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. योगेश माळी सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले, यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती उत्सव सोहळा, २०२६ कार्यक्रम पार पडला. शेवटी राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

+