Visitors: 232268
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

सूचक नाका परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री चार दुकाने फोडलल्याने खळबळ

  team jeevandeep      05/02/2025      sthanik-batmya    Share


कल्याण : कल्याण पूर्वेतील सूचकनाका परिसरातील वाहनांची वर्दळ असणाऱ्या पुना लिंक रोड परिसरातील चार दुकाने अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री फोडल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. मंगळवारी रात्री साडेतीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून लाखोंचा मुद्देमाल  लंपास केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमुळे उजेडात आला आहे.

 कल्याण पूर्व सूचक नाका परिसरातील मॉडर्न होम्ससह आजूबाजूच्या दुकानात मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी दुकानांचे शटर उचकटून डल्ला मारल्याची  घटना घडली. ज्या चारही दुकानाची अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटली ती दुकाने मार्बलची होती. मध्यरात्री साडे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी या चार दुकानाचे शटर उचकटून दुकानांमधून रोख रक्कम, लॅपटॉप असा मुद्देमाल चोरी केला.  ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

 या चोरीच्या घटनेमुळे या परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण  पसरले असून  या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरोधात दुकानदाराच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्टेशन चे पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.

+