Visitors: 229873
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने “माझ्या मराठीचा बोल” काव्यमय कार्यक्रम संपन्न

  Team jeevandeep       01/03/2025      sthanik-batmya    Share


vachnalay 
कल्याण : लहान मुलाचं भावविश्व वेगळं असतं त्यांना साऱ्या जगाचं कुतूहल असतं बालसुलभ बुद्धीला वर्ण, उच्चार परिचित नसतात. कवींच्या संवेदनातून शब्द लेखणीतून उतरतात तर गीतकारांचे शब्दांतून संवेदना गीतात उतरतात चांगल्या कवींनी एकतरी बालकविता संग्रह लिहावा असे मत ज्येष्ठ कविवर्य अशोक बागवे यांनी सार्वजनिक वाचनालय कल्याण व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला “माझ्या मराठीचा बोल” या काव्यमय कार्यक्रमात केले.
 
१६० वर्षाची अविरत परंपरा जपणाऱ्या वाचनालयाच्यावतीने मराठी भाषेसाठी कार्यरत ज्येष्ठ साहित्यिक रजनीश राणे व योगेश जोशी यांचा सन्मान करण्यात आला. कविवर्य सतिश सोळांकूरकर यांच्या “बल्लू मॉनिटर” या बालकविता संग्रहाचे वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या नवसंकल्पनेतून नाविन्यपूर्ण पद्धतीत सातवर्षीय त्रिशा पटेल हिने परीच्या वेशभूषेत कवी अशोक बागवे यांच्या सहकार्याने प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न झाला. बालकलाकार स्वरांगी जानवे हिने सुमधुर आवाजातून दोन प्रातिनिधिक कविता सादर केल्या. ज्येष्ठ कविवर्य अशोक बागवे आणि सतिश  सोळांकूरकर यांच्याशी सुसंवादक सुधीर चित्ते यांनी मनमोकळ्या गप्पांच्या माध्यमातून रसिक वाचकांना मंत्रमुग्ध केले.
 
 कवि सतिश सोळांकूरकरांनी “एकता”व “समता” या  कवितांचे सादरीकरणातून श्रोत्यांना बालवयातील आठवणींत घेऊन गेले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, उपाध्यक्षा आशा जोशी, चिटणीस निलिमा नरेगलकर, मुग्धा घाटे, खजिनदार दिलीप कर्डेकर, ज्येष्ठ साहित्यिक राजीव जोशी, दिलीप मालवणकर, गिरिश लटके, साहित्य क्षेत्रांतील अनेक मान्यवर मंडळी, ग्रंथपाल गौरी देवळे,ग्रंथसेविका, वाचकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता अशोक बागवे यांच्या “नदीच्या किनारी नदीला म्हणावे” या सुश्राव्य काव्याने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहग्रंथपाल करुणा कल्याणकर यांनी केले.
+