team jeevandeep 17/04/2025 sthanik-batmya Share
झिडके-अंबाडी :
शहापूर तालुक्यातील वासिंद येथील " चन्ने " कुटुंबातील प्रविण नारायण चन्ने वय वर्ष-44 यांचे उच्च रक्तदाब विकाराने डोंबिवली मधील " एम्स " या खाजगी रूग्णालयात मेंदूतील अती रक्तस्रावामुळे निधन झाले.निधनानंतर मयत प्रविण यांचे शरीर निरोगी धष्टपुष्ट असल्यामुळे येथील डॉक्टरांनी चन्ने कुटुंबियांना विश्वासात घेऊन सल्ला दिला की,मयत प्रविण यांच्या शरीराचे महत्त्वपूर्ण अवयव अत्यंत चांगले आहेत,जर काही आपण हे अवयव दान केलेत,तर एखाद्या जिवंत गरजू व्यक्तिला त्याचा फायदा होऊन आपण एकप्रकारे राष्ट्रीय विज्ञानवादी दृष्टीकोन स्वीकारणाऱ्या आदर्श विज्ञानवादी समाजाचा आदर्श भविष्यात ठराल.हा सल्ला डोंबिवली येथील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांचा मान्य करून,मयत प्रविण यांचे डोळे,किडनी,फुफ्फुस व इतर अवयव दान करण्याचा निर्णय " चन्ने " कुटुंबियांनी घेतल्यानंतर सदरचे शारीरिक अवयव ज्युपिटर हाॅस्पिटल ठाणे,डी.वाय्.पाटील हाॅस्पिटल पुणे,नानावटी हाॅस्पिटल मुंबई व फोर्टीज हाॅस्पिटल मुलुंड आदि गरजू हाॅस्पिटलमध्ये देण्यात आले.
सदर या दूरदृष्टी आणि विज्ञानवादी चन्ने कुटुंबाचा आदर्श यापुढे समाजापुढे राहणारच,त्याचे अनुकरण इतरांकडूनही करण्यात यावेत,हा संदेश या घटनेमागचा आहे.हे चन्ने कुटुंब शहापूर तालुक्यातील खर्डी येथील मुळरहिवासी असून,आंबेडकरी चळवळीतील वारसा जपणारे आहे,हे देखील सर्वश्रुत आहे.