Visitors: 391061
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

सहायक आयुक्तांची डोंबिवलीतील त्या रस्त्यावर कारवाई, अतिक्रमण हटवलं

  team jeevandeep      05/04/2025      sthanik-batmya    Share


डोंबिवली :

पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील त्रिमूर्तीनगर बाहेरील अर्धाअधिक रस्ता झाडांच्या कुंड्या विक्री करता ठेवतात. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने रस्तावरील कुंड्यामुळे अपघात होण्याची  नकरता येत नाही. शनिवार 5 तारखेला पालिकेच्या 'फ' प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त हेमा मुंबरकर व अतिक्रमण पथकाने याठिकाणी कारवाई केली.रस्त्यावरील कुंड्या रस्त्यावरून उचलून बाजूला करण्यात आल्या. या ठिकाणचे अनधिकृत शेड जेसीबीच्या सहायाने जमीनदोस्त करण्यात आले.

पूर्वेकडील त्रिमूर्तीनगर बाहेर अनधिकृत शेड लावून व रस्त्यावर कुंड्या ठेवल्या जातात.याबाबत नागरिकांच्या तक्रारीवरून सहायक आयुक्त मुंबरकर यांनी शनिवारी अतिक्रमण पथकाला घेऊन सदर ठिकाणी कारवाई केली. अपघात होऊ नये व याठिकाणी नियमाचे पालन केले जात नाही याकरिता कारवाई केल्याचे सहायक आयुक्त मुंबरकर यांनी सांगितले.दरम्यान कारवाई पाहून वाहनचालकांनी  पालिका आयुक्त व सहायक आयुक्त  मुंबरकर यांचे आभार मानले.

+