team jeevandeep 24/04/2025 sthanik-batmya Share
मागील सन २०१७ ते २०२५ पर्यंत समृध्दी महामार्ग शहापूर तालुक्यातील अंदाड येथील भूसंपादीत झालेल्या सात शेतक-यांना आजपर्यंत मोबदला मिळालेला नसल्यामुळे त्यांनी १ मे रोजी समृद्धी महामार्गांवर बसून आमरण उपोषणाचा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गसाठी शेतकरी गुलाब मंगल भोईर, बेबीबाई दत्तु पवार, सविता काशिनाथ भडांगे, पुनम पंढरीनाथ मोगरे, जयराम नाथा गडगे, यशवंत सिताराम पंडित, निराबाई चिमन भेरे यांच्या जमिनी बाधित झाल्या असून त्यांना मागील सात वर्षापासून समृध्दी बाधित जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.याबाबत तहसिल कार्यालय शहापूर, भिवंडी उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी ठाणे यांचेशी संपर्क करुन त्यांच्या नावावर असणाऱ्या जमिनी सरकारी करुन आम्हाला मोबदला दिला नसल्याचा आरोप शेताकऱ्यांनी केला आहे.तथापी यासंदर्भात राज्यपाल यांचे पत्र देखील आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.वारंवार पाठपुरावा करूनही कोणत्याही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.दरम्यान मागील ४ वर्षात २ शेतकऱ्यांचा मोबदला प्रतिक्षेत व जमिन संपादित झाल्याने मानसिक धक्क्याने मृत्यु झाला असून उर्वरित शेतकरी समृध्दी महामार्ग येथे आमरण उपोषण करणार आहेत.
#प्रतिक्रिया #
★ शेतकऱ्यांशी माझं बोलणं झालं आहे.ते उपोषण करणार नाहीत.- परमेश्वर कासुले, तहसीलदार शहापूर.
★२०१७ पासून आम्ही जमिनीच्या मोबदल्यासाठी पाठपुरावा करत आहोत.आता समृद्धी महामार्ग सुरु होत आला तरी अजूनही आम्हाला दाद मिळाली नाही.आम्ही मेल्यानंतर आम्हाला जमिनीची मोबदला देणार का.आम्ही आमरण उपोषणच्या निर्णयावर ठाम आहोत.- गुलाब मंगल भोईर, समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी.