team jeevandeep 04/04/2025 sthanik-batmya Share
मुरबाड प्रतिनिधी- कल्याण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते श्री कमलाकर घोलप यांच्या धर्मपत्नी समाजसेविका सौ सांगिता कमलाकर घोलप यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत मंत्रालय वार्ताचे संपादक अनिल आहिरे आणि निशा ताई भगत यांनी यशवंतराव चव्हाण सभागृह मंत्रालय मुंबई येथे,देशाचे आश्वासक नेतृत्व, माजी कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभस्ते राज्यस्तरीय महिलाभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या शानदार सोहळ्याचे अध्यक्ष स्थान माजी मंत्री आणि सध्याचे विद्यमान खासदार चंद्रकांतजी हंडोरे यांनी भूषविले.यावेळी विचार पिठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता महेश तपासे, महागायक विष्णू शिंदे,रिपाई नेते अण्णासाहेब रोकडे, डॉ अश्विनी कांबळे उपस्थित होते.
मुरबाड कल्याण तालुक्यातील गोर गरीब गरजू शोषित, पीडित अन्यायग्रस्त माणसाला न्याय मिळवून देण्याचे काम सौ संगीताताई घोलप यांनी केले आहे. सध्या त्या कल्याण घोलपनगर येथील महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. आतापर्यंत त्यांनी गरजू महिलांचे अनेक
प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. त्यांनी कोविड काळात सेनीटायझर, मास, रुग्णाना लागणारी मदत, जीवाची पर्वा न करता केली. शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून देण्याचे काम करुन महिलांचा आशीर्वाद यांना लाभला आहे. यामुळे त्यांची महिला वर्गात एक प्रामाणिक समाजसेविका म्हणून ओळख निर्माण केली आहे.या त्यांच्या कार्याची दखल घेत,मंत्रालय वार्ताचा मानाचा राज्यस्तरीय महिलाभूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले.
सौ संगीताताई घोलप यांच्या निवडीने,कल्याण, मुरबाड बदलापूर, ठाणे,मधुन सामाजिक राजकीय, शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या मित्र मैत्रीनी व राजकीय पुढारी कार्यकर्ते महिला यांनी अभिनंदनाचा वर्षाव करुन पुढील आयुष्या साठी आणि वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत..