team jeevandeep 22/03/2025 sthanik-batmya Share
जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खर्डी येथे आज एक दिवसीय राज्यस्तरीय संशोधन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन श्री रविंद्र घोडविंदे सर अध्यक्ष जीवनदीप शैक्षणिक संस्था यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी संशोधनाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. ही कार्यशाळेच्या दुस-या सत्रात डॉ नंदकिशोर चंदन ( प्राध्यापक व विभागप्रमुख सिध्दार्थ महाविद्यालय मुंबई) यांनी विद्यार्थ्यांना संशोधन पध्दतीशास्त्राचा सविस्तर परिचय करून दिला तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठतील त्यांचे संशोधनाचे अनुभव सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तद्नंतर डॉ कुलदीप राठोड ( वाणिज्य विभाग बी.एन.एन महाविद्यालय) यांनी विद्यार्थ्यांना संशोधनचौर्य म्हणजे काय ? हे समजून सांगून संशोधन करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.तद्नंतर डॉ निलेश जाधव ( रसायनशास्त्र विभाग,किन्वहली महाविद्यालय) यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाचे लेखनशास्त्र व प्रसिद्धी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.डॉ दिपक वायाळ ( नेस वाडिया महाविद्यालय पुणे) यांनी विद्यार्थ्यांना संशोधकाचे मूल्य व संशोधनास सहाय्यक असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी डॉ के बी कोरे, श्री प्रशांत घोडविंदे व प्राचार्य कैलास कळकटे उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा सोनम मोरे यांनी केले.कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा वैष्णवी साळुंखे यांनी केले. तर आभार प्रा विशाल भोसले यांनी मानले.कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा सोनम मोरे व प्रा रोहन निळे यांनी जबाबदारी पार पाडली. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृदांने मेहनत घेतली. या कार्यशाळेमध्ये जवळपास १२५ विद्यार्थी सहभागी झाले