Visitors: 237694
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

संत रोहिदास महाराज चौकाचे भव्य सुशोभीकरण

  टीम जीवनदीप       27/12/2024      sthanik-batmya    Share


कल्याण : शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना, कल्याण प्रणित श्री संत रोहिदास ज्ञाती समाज, संत रोहिदास वाडा,  कल्याणचे ज्ञाती अध्यक्ष महेश भोईर आणि पत्रकार रघुनाथ सुरळकर यांच्या अथक पाठपुराव्याने कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या सामाजिक उपक्रम निधीतून मंजूर झालेल्या स्मारकाचे नुतणीकरणाचा शुभारंभ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कल्याण ज्ञाती बांधवांसह कल्याण-डोंबिवली शहरातील संत रोहिदास महाराज चौकातील जीर्ण झालेल्या स्मारकाचे भव्य-सुंदर स्वरुपात नुतणीकरण सोहळ्याचे भूमी पूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

 संत रोहिदास महाराज ज्ञाती समाजाचे जेष्ठ नागरिक विष्णू सातवे, नारायण वाळंज, पंढरीनाथ भोईर, निलेश भोर, विनोद गायकवाड, आदींसह सागर सुरेश जाधव (उपाध्यक्ष), विकास रोकडे, (सेक्रेटरी) गणेश वाळंज, नितीन भोईर (हिशोबणीस), सागर मण्यार (उप-हिशोबणीस) चंद्रशेखर भोईर, जगदिश वाघचौरे, सुनिल वाळंज, अमित भोईर, अभिषेक निंबाळकर, अश्विन सातवे, योगेश रोकडे, कमलेश भोईर, कल्पेश रोकडे, जितेश खंबायत इ. अनेक समाजबांधव उपस्थित होते. समाज अध्यक्ष महेश भोईर यांनी  सर्वांचे आभार मानले.

+