team jeevandeep 21/04/2025 sthanik-batmya Share
मुरबाड -प्रतिनिधी
मुरबाड तालुक्यातील शिरवली काकडपाडा येथे मानव सेवा सामाजिक संस्थे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरात 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली. मानव सेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुरेश बांगर यांनी हे मोफत आरोग्य शिबिर नागरिकांसाठी आयोजित केले होते. यामध्ये रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉक्टर पुनम डोंगरे , डॉक्टर ऋतुजा यादव , डॉक्टर अश्विनी जंगम व महागणपती हॉस्पिटल नर्सेस , स्टाफ यांनी सहभाग घेतला.
गावचे पोलीस पाटील हर्षल घागस , दत्तात्रय म्हाडसे , लक्ष्मण घागस, धनाजी म्हाडसे व काकड पाडा शिरवली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने शिबिरासाठी उपस्थित होते.