Visitors: 235883
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

वेश्या व्यवसाय करणाऱ्या व करूवुन घेणाऱ्या टोळीवर महात्मा फुले चौक पोलिसांचा छापा

  team jeevandeep      10/01/2025      sthanik-batmya    Share


कल्याण : कल्याण पाश्चिमेतील महात्मा फुले चौक पो.स्टे.च्या हद्दीमध्ये कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठया प्रमाणामध्ये वेश्या व्यवसाय चालु असल्याबाबत वेळोवेळी  नागरिकांकडुन तक्रारी  प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींचे गार्भीय लक्षात घेउन कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वेश्या व्यवसाय करणा-या व करून घेणा-या महिलांवर कायदेशिर कार्यवाही करण्याकरीता  अपर पोलीस आयुक्त  संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक  ज्ञानेश्वर साबळे यांनी पोलीस पथक तयार केले होते.

आज  कल्याण रेल्वे स्टेशन परीसरात भिंवडी बस स्टॉपच्या पाठीमागे मोकळया जागेत कल्याण प. येथे तीन महिला शेठाणी व एक पुरूष हे काही पिडीत महिलांना वेश्याव्यवसायासाठी प्राप्त करून, त्यांना पैशाचे आमिष दाखवुन त्यांना शरीरसंबंधासाठी मुलींची मागणी करणा-या ग्राहकांसोबत पाठवुन ग्राहकांसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करवुन घेत आहेत. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक  ज्ञानेश्वर साबळे यांनी याबाबत  वरिष्ठांना माहिती देउन पोलीस पथकास कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. 

त्याप्रमाणे पोलीस पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून तीन महिला शेठाणी व एक पुरूष तसेच एकुण १३ पिडीत महिला यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोहवा  मनोहर  चित्ते यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने यातील महिला आरोपीत नामे १) मर्जिना मंडळ  २) विमलेश उर्फ पिंकी  गुप्ता  ३) सरस्वती  पांडे व पुरूष आरोपी  प्रशांत  गायकवाड यांच्या विरोधात महात्मा फुले चौक पो. स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या गुन्हयामध्ये एकुण १३ पिडीत महिलांना ताब्यात घेउन त्यांना सुरक्षिततेकामी महिला सुधारगृह, उल्हासनगर ५ येथे जमा करण्यात आले आहे. या गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक  ज्ञानेश्वर साबळे हे करीत आहेत.

+