team jeevandeep 26/03/2025 sthanik-batmya Share
विक्रमगड :
बिहारहुन आपल्या राहात्या घरातुन आई वडील आपल्या तिन अल्पवयीन मुलींना सारखी सारखी काम करीत नाही तुमचा काही उपयोग नाही घरातुन निघुन जा रागाचे भरात बोलत असल्याने या तिन्ही मुली आई वडीलांच्या अशा बोलण्याला कंटाळुन 20 मार्च रोजी आपल्या राहत्या बिहारच्या घरुन निघुन आल्या होता या तिन्ही अल्पवयीन मुलींचा शोध चालु असल्याची खबर विक्रमगड पोलिसांना मिळताच विक्रमगड पोलिस कार्यालयाचे पोलिस निरिक्षक रविंद्र पारखे,उपनिरिक्षक दिपक धुस, पोलिस naaik सुशिल बांगर,
पोलिस नाईक संदीप पाटील यांची एक टिम तयार करुन मुलींचा शोध घेत अवघ्या अर्धा तासात या मुलींचा शोध लावला.व सदर बातमीची माहिती बिहार पोलिसांना दिली आहे.सध्या हया मुली बिहार पोलिसांच्या ताब्यांत देण्यात आल्याचेही कार्यालयाकडुन सांगण्यात आले अशा प्रकारे विक्रमगड पोलिसांनी कर्तव्य बजावत उत्तम कामगिरी केल्याबददल विक्रमगड वासियांकडुन त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
या मुलींच्या आई वडील यांनी त्यांच्या तिन मुली 20 मार्च राजी बिहार येथील राहात्या घरातुन निघुन गेल्याची तक्रार बिहार पोलिसांना अर्जाद्वारे केली होती त्यानंतर बिहार पोलिसांनी तपास सुरु केला असता त्यांना हाती काही लागत नसल्याने याबाबतची खबर इतर पोलिस कार्यालयात दिली होती त्यानुसार विक्रमगड पोलिसांना याबाबतची माहिती होताच अवघ्या अर्धा ते पाउन तासांमध्ये या मुलींचा शोध लावण्यात विक्रमगड पोलिस टिमला यश आले.