Visitors: 227188
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

वाढत्या तापमानामध्ये नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी घ्यावी - डॉ. अमोल गिते

  team jeevandeep      26/04/2025      sthanik-batmya    Share


ठाणे : प्रतिनिधी

वाढत्या तापमानामध्ये नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी घ्यावी - डॉ. अमोल गिते

आजकाल तापमान 40 टक्के डिग्री पेक्षा जास्त झाले आहे. ठाणे आणि एमएमआरडीए परिसरात बांधकामाचे, रस्त्यांचे, मेट्रोचे कामे चालु आहेत त्यामुळे उष्णता वाढली आणि लोकांनी स्वतःची काळजी न घेतल्यामुळे उष्णामध्ये गेल्यामुळे सनस्ट्रोकचे रुग्ण वाढले आहे. नागरिकांनी काम नसताना दुपारचे वेळेत गरज नसताना उन्हामध्ये जाऊ नये. शक्यतो घरातच आपले कामकाज करावे व ऑफिसमध्ये असेल तर ऑफिसमध्ये काम करावे. डिलिव्हरी बॉय किंवा उन्हामध्ये काम करणारे नागरिक असतील तर त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. छत्रीचा वापर करावा, डोक्यावरती रुमाल घ्यावे जेणेकरून त्याच्या पासून बचाव करता येईल. वाढत्या तापमानामध्ये नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी घ्यावी असे आवाहन सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ.अमोल गिते यांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून केले आहे.

     वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना व्हायरल फीवर, खोकला, डीहायड्रेशन, जुलाब, उलट्या असे आजार प्रामुख्याने होतात. पण लोकांनी चांगला आहार व स्वतःची काळजी घेतली तर त्यामधून बचाव करता येतो. आहारामध्ये बदल करावा. आहारामध्ये लोकांनी  शीतपेय, कोल्ड्रिंक्स टाळावे, साधं पाणी, पायनॅपल, टरबूज, संत्री मोसंबी असे जास्त पाण्याचे प्रमाण असलेले फळे खावे. तसेच बाहेरचे चमचमीत पदार्थ,रस्त्यावरतीचे व उघड्यावरील  पदार्थ खाणे टाळावे, जास्त आहार घेऊ नये. साधारण आहार व पचन होईल असा आहार घ्यावा. जास्त उष्णतेमध्ये जास्त आहार घेतल्यास उलट्या होऊ शकतात, मळमळ होऊ शकते. त्यामुळे शक्यतो संतुलित आहार घ्यावा आणि वारंवार पाणी पीत राहावे. पालेभाज्या व फळे यांचे सेवन जास्त करत राहावे. 

...................

सिद्धिविनायक हॉस्पिटल नेहमीच प्रत्येक प्रसंगांमध्ये नागरिकांना मदत करण्याची भूमिका घेत असते. त्यामुळे संस्ट्रोक किंवा हिट स्ट्रोकचे रुग्ण असतील आजूबाजूला त्यांचे नातेवाईक नसतील परिसरातील लोकांनी त्यांना उचलून आपल्या हॉस्पिटल आणले. अनोळखी व्यक्ती असेल रस्त्यावर चक्कर येऊन पडला तर आजोबाच्या लोकांनी त्यांना उचलूनसिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये आणावे. खर्चाची काळजी करू नये. सिद्धिविनायक हॉस्पिटल त्यांना मोफत उपचार करेल. सिद्धिविनायक हॉस्पिटल नेहमीच सामाजिक बांधिल जपत असते. अशा रुग्णांसाठी आम्ही पूर्ण मदत करत आहोत. ठाणेकरांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी व व्यवस्थित आहार घ्यावा वा उष्णामध्ये जाण्याचे ताळावे.

डॉ. अमोल गिते

संचालक

सिद्धिविनायक हॉस्पिटल, ठाणे

+