team jeevandeep 24/04/2025 sthanik-batmya Share
ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ या तालुक्यांतील डोंगर पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर वणवे लागत आहेत. सततच्या वणव्यांमुळे सजीव सृष्टीची होरपळ होत आहेच शिवाय वनौषधी देखील होरपळतांना दिसत आहेत. दरम्यान शहापूर तालुक्यातील आटगांव राऊंड मधील जंगलात वणवा लागल्याची माहिती समजताच आटगाव वनपाल संदीप केदार, वनरक्षक संतोष खंदारे, चेतना खाडे,पल्लवी कोळी व इतर कर्मचाऱ्यांनी भर उन्हात जीवाची पर्वा न करता वणवा विझवल्याने पर्यायाने शेकडो हेक्टर वनजमीनीवरील वन संपदा वाचवल्याने ते कौतुकास पात्र ठरले आहेत.
शहापूर उपवनसंरक्षक कार्यालयाअंतर्गत असलेल्या आटगाव राऊंड मध्ये १ हजार आठशे ते १ हजार ९५० हेक्टर वनजमीन समाविष्ट आहे. आटगाव राऊंड अंतर्गत असलेल्या वन क्षेत्रात वणवा मोठ्या प्रमाणात लागला होता.या वणव्याची माहिती वनपाल संदीप केदार यांना मिळताच ते आपल्या सहका-यांसोबत घटनास्थळी दाखल होऊन सर्वांनी मोठ्या धैर्याने हा वनवणवा विझवून जंगल आगीपासून वाचवण्यात त्यांना यश मिळाले.या जंगलात औषधी वनस्पतीसह ऐन,धावडा, साग,मोह,टेंभुर्णी अशा विविध प्रकारची झाडे पहावयास मिळतात.तथापी या भागात मोठ्या प्रमाणात कंपन्या असून यांचा यांचा जमा केलेला कचरा तिथेच पेटवला जातो.पर्यायाने हवेमुळे जाळ उडून जंगलाला वनवा लागला जात असल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शीनी बोलतांना सांगितले.