team jeevandeep 02/05/2025 sthanik-batmya Share
टिटवाळा :
रुंदे आंबिवली ग्रामपंचायत उपसरपंच पदी माणिक चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे,
कल्याण तालुक्यातील रुंदे-आंबिवली ग्रामपंचायत एकुण आठ सदस्य आहेत,
उपसरपंच पदा साठी मानिक चौधरी यांनी अजै दाखल केला होता, सभा अध्यक्ष तथा सरपंच नरेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली यावेळी सदस्य नरेश चौधरी, माणिक चौधरी, रेणुका चौधरी, वैशाली चौधरी, गुरुनाथ फसाले,महेश देसले इत्यादी उपस्थित होते, ग्रामसेवक डि सी भेरे यांनी अजौची छननी करुन वैध असल्याचे सांगितले,उपसरपंच पदासाठी मानिक चौधरी याचा एकमेव अजै आल्याने सभा अध्यक्ष तथा सरपंच नरेश चौधरी यांनी उपसरपंच पदी मानिक चौधरी यांची निवड जाहीर केली, फटाक्यांच्या अतिशबाजीने जोरदार स्वागत केले,
नवनिर्वाचित उपसरपंच माणिक चौधरी यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजाराम चौधरी,बाजार समितीचे संचालक रवींद्र घोडविंदे, योगेश धुमाळ, भाजपचे कल्याण तालुका अध्यक्ष शेखर लोणे,सरपंच नरेश चौधरी, माजी उपसरपंच महेश देसले,राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष चंद्रकांत गायकर,माजी सरपंच विलास चौधरी,, रवींद्र जाधव, चंद्रकांत भोईर,गणेश भोईर ,गणेश चौधरी, गुरुनाथ देसले, माजी पोलीस पाटील सोनु चौधरी, बाळाराम चौधरी प्रभाकर चौधरी, शंकर चौधरी, गणेश बनकरे,यांच्या सह आदि उपस्थित होते,