team jeevandeep 03/05/2025 sthanik-batmya Share
पेण ( प्रतिनिधी) :
राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघ हा श्रमिक संघाकडे नोंदणीकृत असून या संघाचे संस्थापक अध्यक्ष माजी शिक्षक आमदार बाळाराम पाटील साहेब, मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य बी.एल. सगर किल्लारीकर साहेब, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल नाचपले, सरचिटणीस संतोष भोजने, उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, कार्याध्यक्ष बबनराव चव्हाण, प्रसिद्ध प्रमुख सचिन गडपतवार, राज्य कोषाध्यक्ष संजय भोईर या सर्वांच्या एकमतांनी महाराष्ट्र राज्याच्या महिला आघाडीची स्थापना करण्यात आली.. यामध्ये लातूर येथील बाभळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रेखाताई सुडे यांची महिला राज्याध्यक्ष पदी निवड जाहीर करणेत आली. ओबीसी चळवळीतील योगदान, सामाजिक व शैक्षणिक कार्य, समाजाप्रती असलेली सदभावना, संघटन कौशल्य, आजपर्यंतच्या कालावधीमध्ये केलेले विविध उपक्रम आणि मिळवलेले पुरस्कार या सर्वांचा विचार करून संघटनेने त्यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
राज्यातील बहुजन, अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय तथा तत्सम सर्व प्रवर्गातील महिला शिक्षिकांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे रेखाताई सुडे आपल्या निवडीनंतर म्हणाल्या. राज्यभरातील महिला शिक्षिका यांच्या वतीने रेखाताई सुडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.