Visitors: 237699
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

*राष्ट्रीय आट्या पाट्या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील खेळाडू व प्रशिक्षक निवड*

  team jeevandeep      01/01/2025      sthanik-batmya    Share


कल्याण : ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशन चे अध्यक्ष आप्पा शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य आट्या पाट्या महामंडळाच्या मान्यतेने ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान ३७ वी पुरुष व ३४ वी महिला सिनियर महाराष्ट्र राज्य आट्या पाट्या अजिंक्यपद स्पर्धा खडवली, कल्याण येथे आयोजित करण्यात आली होती. 

या स्पर्धेतून ठाणे जिल्ह्यातील पुरुष गटातून एजाज तडवी, चारुदत्त काळे यांची आणि महिला गटातून वैभवी चव्हाण, अनुराधा मोरे यांची आट्या पाट्या फेडरेशन ऑफ इंडिया  आयोजित ३ ते ५ जानेवारी दरम्यान, शेगाव , बुलढाणा येथे होणाऱ्या ३७ वी पुरुष ३३ वी महिला सिनियर राष्ट्रीय आट्या पाट्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशन सचिव, मार्गदर्शक व राष्ट्रीय पंच संजय काळे यांची महाराष्ट्राच्या महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या ठाणे जिल्ह्यातील सर्वांचे अध्यक्ष आप्पा शिंदे तसेच सर्व पदाधिकऱ्यांनी विशेष कौतुक केले. 

+