Visitors: 226859
00/00/0000

भारत आता तडजोड करणार नाही, नरेंद्र मोदी राष्ट्रभक्त आहे त्याचा हिशोब देणार : एकनाथ शिंदे  ठाण्यात भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  ➤ कल्याण रेल्वे स्थानकावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम रखडल्याने प्रवाशांची गर्दी कायम  ➤ एअरस्ट्राईकनंतर नवी मुंबईत नाकेबंदीकरून वाहनांची कसून तपासणी  मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार  ➤ पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेला बसणार फटका ; जागावाटपात भाजपचा वरचष्मा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगला वाटा मिळू शकतो.

रामायु पंचकर्म हॉस्पिटल व वेलनेस सेंटर चे उद्घाटन

  team jeevandeep      30/04/2025      sthanik-batmya    Share


कल्याण :

कल्याण तालुक्यातील जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष तथा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रविंद्र घोंडविदे यांच्या कन्या डॉ प्रतिक्षा रविंद्र घोंडविदे यांच्या रामायु पंचकर्म हॉस्पिटल व वेलनेस सेंटर चे उद्घाटन आज म्हणजे साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक सुंदर मुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

ठाणे जिल्ह्यातशैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा सभापती, संचालक तसेच पत्रकार, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य, आणि जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष रविंद्र घोंडविदे यांच्या कन्या डॉ प्रतिक्षा रविंद्र घोंडविदे यांनी वैद्यकीय अभ्यासातील बी ए एम एस, एम डी आयुर्वेद,अशा उच्च पदव्या प्राप्त करून टिटवाळा येथील प्रसिद्ध महानगपती मंदिरासमोर रामायु पंचकर्म हॉस्पिटल व वेलनेस सेंटर, नावाचे सर्व सोईनियुक्त हॉस्पिटल सुरू केले, यामध्ये पंचकर्म चिकित्सा, आयुर्वेदिक औषधोपचार, जीवनशैली, डिटाँक्स थेरपी, स्त्रीरोग व प्रसूती उपचार, त्वचारोग व संधिवात उपचार, डायबेटीस व स्थूलता नियंत्रण, मानसिक आरोग्य सुधारणा, आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, शिवाय नैसर्गिक व शुद्ध औषधोपचार, स्वच्छ व शांत उपचार कक्ष, रोगमुक्ती व आरोग्य, संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम, अशी विविध वैशिष्ट्ये या उपचार पध्दतीची असल्याचे डॉ प्रतिक्षा घोंडविदे यांनी सांगितले.

या हॉस्पिटल चे उदघाटन मठाधीपती अलोकनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते झाले, यावेळी टिटवाळा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम, कल्याण तालुका शिवसेना प्रमुख वसंत लोणे, काँग्रेस चे जेष्ठ नेते राजाभाऊ पातकर,  यशवंत दळवी, अशोक भोईर, जिल्हा बँक उपाध्यक्ष अरुण पाटील, शिवसेना जिल्हा संघटक सुदाम पाटील, भाजपा उपाध्यक्ष राजाभाऊ चौधरी, रुंध्याचे सरपंच  चौधरी, बाळा चौधरी, जाणू बुटेरे, ,  माझी उप महापौर उपेक्षाताई भोईर, मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, बाजार समितीचे माजी संचालक मयूर पाटील, जालिंदर पाटील, कोंडू नाना भोईर, तालुका प्रमुख नरेश सुरोशी, भाजपा तालुका प्रमुख शेखर लोणे, बाजार समितीचे संचालक योगेश धुमाळ, घोटसई चे सरपंच राजू मगर, शिवसेनेचे जेष्ठ नेते सदाशिव सासे, शिवसेना महिला आघाडीच्या माधुरी वाळिंबे, मधुकर वाळिंबे, काशिनाथ चोरघे,  प्रकाश भोईर, बजरंग आग्रवाल, सुयोग मगर, आकाश सुरोशी, मनोहर घारे, पंडीत घारे, विलास गायकर सर, विकास गायकर, पत्रकार संजय कांबळे, राजू टपाल, विलास भोईर, मुरबाड च्या माजी सभापती श्रेयाताई चौधरी, ऍड सचिन चौधरी, मंगेश बनकरी, अमर बनकरी, छगन बनकरी, आत्माराम बनकरी, राजेश बनकरी, टिटवाळ्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर, अण्णा तरे, नरेंद्र पाटील, दिनेश माळी सर, राजेंद्र सूर्यराव सर, प्रथमेश भोईर, पुष्पा भोईर, तुकाराम भोईर, स्नेहल घरत, सखाराम सुरोशी, लहू शेलार, जयवंत कोर, मुकेश शेलार, प्रकाश दळवी वसंत दळवी, चंद्रकांत भोईर, रवींद्र जाधव, पांडुरंग टेम्भे, जयराम लोणे, नेताजी भोईर, भास्कर मिरकुटे,सतीश चौधरी यांच्या सह ग्रामीण व टिटवाळ्यातील मान्यवरानी या हॉस्पिटल ला शुभेच्छा दिल्या, योगा चार्य डॉ vijy कुकरेजा 

या सोहळ्याला कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम, तालुक्यातील विविविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावचे सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार संजय कांबळे, विलास भोईर, राजू टपाल, तसेच जीवनदीप महाविद्यालयाचे प्राचार्य वाघ सर,उप प्राचार्य सोष्टेसर, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आदी मान्यवर उपस्थित होते,

+