team jeevandeep 04/04/2025 sthanik-batmya Share
बेकायदेशीर भिश्या व व्याजी पैसे देणाऱ्यावर टाच आणण्याची गरज....
मुरबाड-प्रतिनिधी :
गेले अनेक दिवस मुरबाड मध्ये शेकडो महिलांना कोटी रुपयांचा आर्थिक गंडा घालणाऱ्या जयश्री उर्फ राणी जनार्दन देशमुख यांनी मुरबाड शहरातील महिलांची फसवणूक तर केलीच पण ग्रामीण भागातील अनेक महिलाही जास्त व्याजाच्या अमिषाला बळी पडल्या आहेत. मोल मजुरी ,कष्ट करून आयुष्य भराची पुंजी करून दागिने बनवले होते.याच दागिन्यांवर राणी देशमुख व तिच्या साथिदारांनी डल्ला मारला असून आज त्या सोन्याच्या दागिन्यांना मुकल्या असून त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.घरी दागिने ठेवण्यापेक्षा मला द्या मी तुम्हांला जास्त व्याज देईन या अमिषाला महिला बळी पडल्या आहेत. फसवणूक झालेल्या या गरिब महिलांचे गेलेले दागिने कसे मिळणार हा प्रश्न उभा राहिला असून मुरबाड पोलिसांच्या तपास यंत्रणेवर अवलंबून आहे. मुरबाड पोलीसांनी फसवणूक झालेल्या या सर्व महिलांना न्याय द्यावा अशी मागणी सर्वत्र होत आहे.
दरम्यान मुरबाड शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर भिश्या व व्याजी पेसै देण्याचे प्रकार सुरु असून पोलीसांनी या बेकायदेशीर धंद्यावर टाच आणावी व यातून सामान्य लोकांची होणारी आर्थिक फसवणूक टाळावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
* महिलांच्या आर्थिक फसवणूकीतील महिला आरोपी ला न्यायालयाने पोलीस कस्टडी दिली असून मुरबाड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.**
संदिप गिते , वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरबाड