Visitors: 235863
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द - कामगार मंत्री अँड.आकाश फुंडकर भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबत कामगार मंत्र्यांच्या आढावा बैठकीत दिले आश्वासन

  team jeevandeep      09/01/2025      sthanik-batmya    Share


कल्याण : राज्यातील प्रत्येक कामगाराचा विकास हा केवळ आर्थिक पातळीवर नाही तर सामाजिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवरही होण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे आश्वासन राज्याचे कामगार मंत्री अँड. आकाश फुंडकर यांनी व्यक्त केले. मंत्रालयात कामगार मंत्री यांनी भारतीय मजदूर संघाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी भारतीय मजदूर संघाचे  क्षेत्रीय संघटन मंत्री सी. व्ही. राजेश, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड अनिल ढुमणे, प्रदेश महामंत्री किरण मिलगीर, विदर्भ प्रदेश अध्यक्ष रवींद्र गणेशे, महामंत्री गजानन गटलेवार  आणि भारतीय मजदूर संघाचे वरिष्ठ  पदाधिकारी उपस्थित होते.

कामगार मंत्री फुंडकर यांनी यावेळी सांगितले की,  महाराष्ट्र शासनाचे कामगार विषयक धोरण तयार करण्याबाबत चर्चा करण्यात येईल. तसेच कामगारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार विमा रुग्णालय स्थापन करण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल. असंघटित कामगारांच्या विकासासाठी निधी उभारण्याचे नियोजन असून या निधीच्या माध्यमातून असंघटित कामगारांसाठी विमा, आरोग्य या योजना राबवण्याच्या शासनाच्या विचाराधीन असल्याचे मंत्री फुंडकर यांनी सांगितले.

भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींनी यावेळी आपले निवेदन कामगार मंत्री  अँड. आकाश फुंडकर यांना  सादर केले असून  कामगारांच्या समस्या, त्यांच्या अडचणी, आणि  कामगार संघटनांच्या मागण्या, त्यांच्या अंमलबजावणीची स्थिती याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेत भारतीय मजदुर संघ प्रदेश संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ, प्रदेश सचिव विशाल मोहिते, अखिल भारतीय  ठेका मजदुर महासंघाचे अखिल भारतीय महामंत्री सचिन मेंगाळे, पुणे जिल्हा सेक्रेटरी सागर पवार, असंघटित क्षेत्र सह प्रभारी श्रीपाद कुटासकर, हर्षल ठोंबरे,   कोषाध्यक्ष ऍड बाळकृष्ण कांबळे,  घरेलु कामगार संघ प्रदेश अध्यक्ष शर्मिला पाटील, सरचिटणीस संजना वाडकर, प्रदेश सचिव व प्रदेश बांधकाम संघटनेचे अध्यक्ष हरी चव्हाण उपस्थित होते.

+