team jeevandeep 10/05/2025 sthanik-batmya Share
समाजातील व्यक्तींना राजपूत गौरव पुरस्काराने केले सन्मानित
ठाणे : प्रतिनिधी
महाराणा प्रताप जयंतीचे औचित्य साधून राजपूत परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे जिल्हा अध्यक्ष कुँवर राकेश गंभीर सिंह तोमर यांचे नेतृत्वात काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे दि.09 मे 2025 रोजी समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन राजपूत गौरव सन्मान व समाज गौरव सम्मानाने सन्मानित करून महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमात गायक सोनू सिंह सुरीला यांनी महाराणा प्रताप यांचे वीर गीतांनी सर्वांना भावनिक केले. कार्यक्रमासाठी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, संस्थापक राजेंद्र चौहान, उद्योगपती अनिल सिंह, ओमप्रकाश शाही, रामसेना अध्यक्ष रामगुलाम सिंह, माजी नगरसेवक अमित सरैय्या,अमित सिंह, गितांजली देवखेडे, प्रमुख वक्ते ॲड. सुनिल सिंह, समाजसेवक महेंद्र सोडारी, मंगेश सिंह सह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुँवर राकेश सिंह तोमर व सूत्रसंचालन ॲड सुनिल सिंह यांनी केले.