Visitors: 390545
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

रस्त्याच्या मधील खणलेला खड्डा बनतोय यमदूत मनसेने दिला आंदोलनाचा इशारा

  team jeevandeep      29/04/2025      sthanik-batmya    Share


डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर मधील सुभाष डेअरीच्या पुढील रस्त्यावर एक खड्डा खणण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून हा खड्डा तसाच असून प्रशासनाच्या दुर्लक्षित कामकाजामुळे हा  खड्डा भरण्यात आला नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी यावर आवाज उठवला आहे.प्रशासनाने येथील रस्त्यावरील खड्डा बुजविला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.

   डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर येथील ट्रान्सफॉर्मरजवळील रस्त्यावर अनेक दिवसांपासून खड्डा असून तो का खणण्यात आला आहे असा येथील नागरिकांना प्रश्न पडला आहे. सायंकाळी अथवा रात्रीच्या वेळी या खड्यात पडून वाहनचालक जखमी होण्याची शक्यता  येत नाही. मनविसेचे डोंबिवली शहरअध्यक्ष मिलिंद म्हात्रे यांनी याबाबत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.दोन दिवसात हा खड्डा बुजविला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.

चौकट 

येथील खड्डा  बुजविण्यास पालिका प्रशासनाला विसर पडला आहे. येथील खड्यात पडून वाहनचालक जखमी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. या खड्यात पडून कोणी जखमी होऊ नये म्हणून येथील नागरिकांनी खड्यात एक लाकडी बांबू उभा केला आहे.लाकडी बांबू पाहून वाहनचालक सावध होतील व त्यांची वाहने येथील खड्ड्यात पडणार नाही असे नागरिकांनी सांगितले.

+