team jeevandeep 04/04/2025 sthanik-batmya Share
डोंबिवली :
एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा रस्ता ओलांडताना शाळेच्या बसखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार 4 तारखेला डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील केळकर रोडवर घडली. याप्रकरणी बसचालकाविरोधात निष्काळजीपणाने वाहन चालवून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया अशोक मराठे असे अपघातात मृत्यू पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. महिलेचा भाऊ सुधीर दत्तात्रय फडके यांच्या फिर्यादीवरून ओमकार इंटरनॅशनल शाळेची बस ( mh -05 Az0966) चालक दिंगबर मधुकर मिश्री याच्या विरोधात डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.वृद्ध महिला कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर केळकर रोडवर आल्या.रस्त्या ओलांडताना वृद्ध महिला शालेय बसखाली आल्या.केळकर रोडवरजवळील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.रामनगर पोलिसांनी बसचालकाला अटक. केली असून पुढील तपास करत आहेत.