team jeevandeep 17/04/2025 sthanik-batmya Share
कल्याण :
कल्याण तालुक्यातील शहरीकरण झालेली म्हारळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी म्हारळपाडा येथील ग्रामपंचायतीचे जेष्ठ सदस्य लक्ष्मण गोविंद कोगिंरे यांची बिनविरोध निवड झाली, यामुळे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी ,सर्व सदस्य यांच्या सह परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
कल्याण तालुक्यातील एक महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून म्हारळ ग्रामपंचायत ओळखली जाते,१७सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीने आतापर्यंत विकास कामावर लाखोंचा खर्च केला आहे. अशा या ग्रामपंचायतीचे माझी उपसरपंच योगेश देशमुख यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते, त्यामुळे आज या रिक्त उपसरपंच पदासाठी केवळ लक्ष्मण गोंविद कोंगेरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी अमोल मुरबाडे यांनी त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले, यानंतर सरपंच निलिमा नंदू म्हात्रे, माझी सरपंच व विद्यमान सदस्य प्रमोद देशमुख, योगेश देशमुख, अँड दिपक अहिरे, मोनिका गायकवाड, नंदा म्हात्रे,विकास पवार, अमृता देशमुख, प्रकाश चौधरी, मंगला इंगळे,बेबी सांगळे प्रगती को़ंगेरे,अनिता देशमुख, किशोर वाडेकर, वेदिका गंभीरराव आणि अश्विनी देशमुख यांच्या सह ग्रामपंचायत अधिकारी अमोल मुरबाडे व यांचे कर्मचारी अशा सर्वांनी उपसरपंच लक्ष्मण कोंगेरे यांचे शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच पत्रकार संजय कांबळे यांनी ही त्यांना शुभेच्छा दिल्या. आम्ही सर्व सदस्य एकमेकांच्या सहकार्याने गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त उपसरपंच लक्ष्मण कोंगेरे, सरपंच श्रीमती निलिमा म्हात्रे, सदस्य प्रमोद देशमुख यांनी सांगितले.