team jeevandeep 07/04/2025 sthanik-batmya Share
मोरोशी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार राम भरोशे आदिवासी रुग्णांना घ्यावे लागतात खाजगी रुग्णालयाचे उपचार.
प्रशासनाची फक्त मळमपट्टी.
कल्याण :
मुरबाड तालुक्यातील मोरोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात फांगुळगव्हाण येथील आदिवासी शेतमजूर गणपत कारभाळ हे पोटात जबरदस्त दूखु लागल्याने, तसेच उलटी जुलाब सुरू झाल्याने ते प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोशी येथे गेले. परंतु येथे ना डॉक्टर, ना कोणी आरोग्य कर्मचारी!अखेर त्रास वाढल्याने रुग्णाला डॉ भेरे यांच्या खाजगी दवाखान्यात भर्ती करण्यात आले, त्यामुळे या पेंशट चा जीव वाचला, त्यामुळे मुरबाड तालुक्यातील आरोग्य विभागाचा सावळागोंधळ पुन्हा एखाद्या समोर आला आहे.
विशेष म्हणजे, ठाणे जिल्हा परिषदेचे कर्तव्यनिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी कल्याण तालुक्यातील निळजे पीएससीला अचानक भेट दिली होती, यानंतर तेथील कर्मचारी गायब असल्याचे दिसून आल्याने त्यांनी या ५ते६कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात, आरोग्य विभागात खळबळ उडाली होती, यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला होता, असे असताना कालच फांगुळगव्हाण येथील गणपती कारभाळ (४०)हे पोटाच्या व उलटी, जुलाब च्या आजाराने त्रस्त झाल्याने ते मोरोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाले, मात्र हे केंद्र उघडे होते, परंतु या दवाखान्यात ना डॉक्टर, ना नर्स, ना आरोग्य कर्मचारी!श्री कारभाळ हे बाहेर उलट्या करत होते, तडफडत होते. परंतु कोणीच नसल्याने अखेरीस त्यांचा मुलगा किरन कारभाळ याने त्यांना मोरोशी येथीलच डॉ भेरे यांच्या खाजगी दवाखान्यात भर्ती केले. व त्यांचा जीव वाचला,
मुरबाड तालुक्यात९प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, तर ३०उपकेंद्रे असून मोरोशी अंतर्गत, सावरणे, चिंचवाडी, फांगुळगव्हाण, निरगुडपाडा, वाघवाडी, न्याहाडी, पायरवाडी, कुंभाले, वैतागवाडी, वाल्हीवरे, मोंधळवाडी, धारखिंड, आल्याची वाडी, बांडिशेत, लोत्याची वाडी, अवळेवाडी,दिवाणपाडा, भोंराडे, करपडवाडी, फांगणे, भोईरवाडी आणि पेजवाडी, अशी २५ते ३०गावपाडे येतात, हे सर्व आदिवासी समाज असून यांच्या कडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही, हे आदिवासी, जंगलात राहणारे, यांना काय उपचार करायचे?असे हिणवून दुर्लक्ष केले जाते.
नुकतेच पुणे जिल्ह्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारामुळे आरोग्य विभागाची बेअब्रू झाली आहे, अशातच शासकीय रुग्णालये,ग्रामीण रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, यांची अशी परिस्थिती असेल तर जिल्हाची आरोग्य यंत्रणा नक्कीच आयसीयूमध्ये आहे की काय?असा प्रश्न उपस्थित होतो.