team jeevandeep 24/02/2026 sthanik-batmya Share

टिटवाळा : टिटवाळा पूर्वेकडील थारवाणी परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घंटा वाजली आहे. रुंदा रोड, जावईपाडा येथील उतरणीवर आज एक मोठा ट्रक पलटी झाला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. नुकत्याच काही दिवसांपूर्वी भरधाव ट्रक ट्रेलरने अनेक वाहनांना चिरडल्याची घटना अजून ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संताप आणि भीती व्यक्त होत आह
या धोकादायक उतरणीवर जड वाहनांचा वेग नियंत्रणाबाहेर जात असल्याचे वारंवार दिसून येत आहे. प्रशासनाने आणि वाहतूक विभागाने केवळ अपघातानंतर धावपळ न करता, कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. वेगमर्यादेचे काटेकोर पालन, वाहतूक बीट पोलिस बंदोबस्त, स्पीड ब्रेकर, चेतावणी फलक आणि सीसीटीव्ही देखरेख यांची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे.
नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बेफिकीर वाहनचालकांवर कठोर कारवाई झाली नाही, तर अशा घटना पुन्हा घडण्याची भीती नाकारता येणार नाही. आता तरी प्रशासन जागे होणार का?