Visitors: 389901
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

मूल्यमापनासाठी पाठयपुस्तक हे साधन आहे - डॉ. संजय वाघ

  Team jeevandeep      11/06/2025      sthanik-batmya    Share


WhatsApp Image 2025-06-10 at 4-37-03 PM 

ठाणे : प्रशिक्षणाचे स्वरूप बदलले असल्याने व विविध तांत्रिक आडचणी निर्माण झाल्यामुळे वेळ मिळाला नाही. वर्गातील अंतक्रिया समृद्ध झाली पाहिजे. त्याच बरोबर सर्वांनी तांत्रिक बाबी संभाळाव्यात. प्रत्येकाचे ध्येय साध्य झाले पाहिजे. दररोजची परीक्षा थांबवली आहे. परंतु मुल्यमापन आवश्यक आहे. मूल्यमापनासाठी पाठयपुस्तक हे साधन आहे. प्रत्येकाने क्वालिटी डेवलफ केली पाहिजे त्यासाठी आऊट सोर्सेसचा वापर करावा. त्याचबरोबर विषयाचा समन्वय साधता आला पाहिजे.शिक्षणातून मूल्य व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाला अधिकार आणि कर्तव्याची जाणीव आसली पाहिज. शेवटच्या दिवशी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप बदलू शकते. संवेदनशिलता आपल्यामध्ये निर्माण करून शाळा आणि घर याची सांगड कशी घालता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आपल्या सर्व समस्या वरिष्ठांचे निदर्शनास आणून दिल्या आहेत. असे प्रशिक्षणार्थींशी संवाद साधताना शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ठाणेचे प्राचार्य डॉ. संजय वाघ यांनी सांगितले.

   एम. एच. हायस्कूल, ठाणे येथे दिनांक 2 ते 12 जून 2025 या कालावधीत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.09 जून 2025 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ठाणेचे प्राचार्य डॉ. संजय वाघ यांचे समवेत ठाणे केंद्र समन्वयक वरीष्ठ अधिव्याख्याता भगवान खारके, अधिव्याख्याता डॉ. प्रभा खरटमोल सह सर्व प्रशिक्षण वर्गाचे सुलभक यांनी प्रशिक्षणार्थींच्या समस्या समजावून घेतल्या व मार्गदर्शन केले. 

मराठी भाषा वगळता इतर भाषांचे पुस्तकांची प्रशिक्षणार्थींनी मागणी केली होती. त्या सर्व प्रशिक्षणार्थींना सर्व भाषांची संदर्भीय पुस्तके वाटप करण्यात आली. सुलभकांनी सर्वांचे आभार मानले.

+