team jeevandeep 02/03/2025 sthanik-batmya Share
मुरबाड :
दि१: १ मार्च २०२५ शहापूर तालुक्यातील दहागाव वाशिंद, , जिल्हा ठाणे येथे स्टँडर्ड चार्टर्ड बँक, मुंबई विभाग, बँकेच्या वतीने जिज्ञेश सामाजिक विकास संस्था शहापूर यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड व कल्याण येथील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले.
शैक्षणिक उपक्रमांसाठी, स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जुझार टिनवाला आणि मुंबई विभाग स्टँडर्ड चार्टर्ड बँकेची टीम अनुराधा भाटिया,
अमोल चौगुले, के पार्थसारथी,
अमित सिंग व बँकेचे कर्मचारी वर्ग यांनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड कल्याण व भिवंडी परिसरातील गरजू मुलांना १०० लॅपटॉपचे वाटप केले आहे.
हा उपक्रम दहावी, बारावी आणि पदवीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आला. जिज्ञेश सामाजिक विकास संस्था शहापूर, यांच्या वतीने संचालक ॲडव्होकेट दिनेश हरड, संचालक शरद डोंगरे, मनिष भालेराव, यशवंत गायकवाड,संतोष परदेशी, संजय दामोदर व ग्रामस्थ यांनी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या सर्व टीमचे आभार मानले आहेत.