team jeevandeep 08/04/2025 sthanik-batmya Share
मुरबाड दि.८ :
मुरबाड नगर पंचायतीद्वारे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात कराद्वारे विक्रमी २ कोटी ४६ लक्ष एवढी वसुली करण्यात आली आहे अशी माहिती मुरबाड नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी दिली आहे.
सन २०२४-२५ या वर्षात विविध कराची मागणी व वसुली पुढीलप्रमाणे आहे. मालमत्ता कर- १कोटी ९७ लक्ष (मागणी) - १ कोटी ८६ लक्ष (वसुली) - ९४% पाणीपट्टी - ८३ लक्ष (मागणी) - ५१ लक्ष (वसुली) - ६१% गाळाभाडे-१२ लक्ष (मागणी)- ९ लक्ष (वसुली) - ७५% मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी करवसुली करिता विशेष नियोजन करून तसेच सर्वांना कर वसुली बाबत चांगले मार्गदर्शन करून पथक निर्माण करण्यात आलेले. वसुलीकामी थकबाकीदारावर जप्ती नोटीस बजावण्यात आलेली, तसेच नळजोडणी खंडित करणेची कार्यवाही करण्यात आली. काही वाणिज्य मालमत्ता सील करण्यात आल्या. यावेळी विक्रमी वसुली झाल्यामुळे मुख्याधिकारी यांनी मुरबाडकरांचे आभार व्यक्त केले आहे. तसेच यापुढेही मुरबाड नगर पंचायतीमध्ये सुखसोयी पुरवण्याकरिता नागरिकांनी कराचा नियमित भरणा करण्याकरिता आव्हान करण्यात आले आहे.
* यंदाचा उन्हाळा अतिशय कडक जाणवत असला तरी मुरबाड नगरपंचायतची कर वसुलीसाठी वसुली पथक उन्हा-तहणाचा विचार न करता वसुलीसाठी नेमलेली टीम चांगल्या पद्धतीने कर वसुली करत आहे.
**यंदा दोन कोटी ४६ लाखाची विक्रमी वसुली करण्यात आली आहे.
***विक्रमी वसुली झाल्याबद्दल मुरबाड करांचे मानले आभार.
मनोज म्हसे
मुख्याधिकारी
मुरबाड नगरपंचायत