Visitors: 390299
00/00/0000

➤ केडीएमसी हद्दीत कोरोेनाचा शिरकाव : एकाचा मृत्यू ; चार रुग्णांवर उपचार सुरु ; नागरीकांनी सतर्क राहण्याचे केडीएमसीचे आवाहन  कल्याण तालुक्यातील उल्हासनदी परिसरात पुराच्या पाण्याचा फटका  ➤ मोहिली उल्हासनदी पत्रातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुरख्यांना  दोन देवदुतांनी सुखरूप बाहेर काढले     ➤ दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई ➤ म्हारळ गावासमोरील हायप्रोफाइल रिजन्सी मध्ये आगडोंब  रायगड जिल्ह्यात  8 जून पर्यंत जमावबंदी लागू-अपर जिल्हादंडाधिकारी

मुरबाड ग्रामीण भागात अवकाली वादळी पाऊस वाऱ्याच्या फटक्याने नुकसान!

  team jeevandeep      08/05/2025      sthanik-batmya    Share


मुरबाड दि.७ :

मुरबाड ग्रामीण भागात मंगळवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी पाऊस वाऱ्याचा फटका बसल्याने यामध्ये तालुक्यातील  करवेळे, वैखारे,कोलठण,शिवळे,वनोटे येथील   २५ते३० घरावरील पत्र /कौले उडून नुकसान झाले आहे. तसेच मासळे येथील जिल्हा परिषद शाळेवर झाड पडून शाळेचे नुकसान झाले आहे.  

या घटनेची माहिती  मिळताच मुरबाड तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तलाठी, सर्कल मंडळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून ज्या ज्या घरांचे अशंत नुकसान झाले आहे त्या  त्या घरांचे तात्काळ पचनामे करण्यात आल्याची माहिती मुरबाड तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.सदरचा प्राथमिक अहवाल पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला आहे.

 यापूर्वी १३ एप्रिल २०२५रोजी  अककाली पावसाचा मुरबाड ग्रामीण भागात वादली वाऱ्यास पावसाचा जोरदार फटका बसला होता त्यामध्ये जवळपास ४५ घरावरील पत्रे/कौले उडून नुकसान झाले होते त्यानंतर मंगळवार ६मे २०२५ रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊसचा फटका बसल्याने त्यामध्ये २५/ ३० घरांवरील  पत्रे/कौले उडून नुकसान झाल्याचा हा तालुक्यात  दुसऱ्यांदा फटका बसला आहे.तसेच गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण तसेच  हवेतील गारवा जाणवला.

+